"...आंतरराष्ट्रीय महिला दिन: स्त्रीशक्तीचा गौरव आणि संस्कारांचे महत्त्व!..."
* आपण दरवर्षी प्रमाणे ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात "...आंतरराष्ट्रीय महिला दिन..." मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण, त्यांचे सशक्तीकरण आणि समाजातील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. आजच्या आधुनिक युगात महिलांचे स्थान अधिक भक्कम होत आहे, मात्र त्याचबरोबर त्यांच्यासाठी नैतिकता, संस्कार, आणि योग्य वर्तन यांचे महत्त्वही तेवढेच वाढले आहे.
१) स्त्री: कुटुंब आणि समाजाची शिल्पकार :-
महिला ही फक्त एक व्यक्ती नसून कुटुंबाची, समाजाची आणि संस्कृतीची शिल्पकार आहे. ज्या घरात संस्कारी स्त्री असते, ते घर सदैव आनंदी आणि सुखी राहते. महिलांचे चारित्र्य, विचारसरणी आणि त्यांचे कर्तृत्व संपूर्ण कुटुंबावर प्रभाव टाकते.
🌹स्त्रीशक्तीची विविध रूपे:
आई – प्रेम, माया आणि त्याग यांचे मूर्तिमंत रूप.
पत्नी – समर्पण आणि सहकार्याची ओळख.
बहीण – निःस्वार्थ प्रेमाचा धागा.
मुलगी – घराला आनंद देणारी आणि भविष्य घडवणारी.
२) स्त्री वर्तन आणि संस्कारांचे महत्त्व :-
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. समाजात एक आदर्श स्त्री म्हणून उभे राहण्यासाठी तिच्या वर्तन आणि संस्कारांचे विशेष महत्त्व आहे.
(१) नीतिमूल्ये आणि चारित्र्य:
स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आधार तिचे चारित्र्य आणि नैतिकता असते. सत्यता, प्रामाणिकपणा आणि संयम हे तिच्या जीवनाचे मूलभूत तत्त्व असायला हवे.
(२) मर्यादा आणि सन्मान:
स्त्रीने स्वतःच्या सन्मानाचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्त्रियांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा अपवापर न होता, त्याचा योग्य वापर व्हायला हवा.
(३) सुशिक्षित आणि सुसंस्कृत राहणे:
आजच्या काळात शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. शिक्षणाने स्त्री आत्मनिर्भर बनते आणि आपल्या हक्कांसाठी उभी राहू शकते. परंतु केवळ शिक्षण पुरेसे नाही, संस्कार आणि नैतिक मूल्येही तेवढीच महत्त्वाची आहेत.
(४) नम्रता आणि सहनशीलता:
स्त्रीने अहंकार टाळून नम्रतेने वागावे, कारण नम्रतेमुळे समाजात सन्मान वाढतो. सहनशीलता आणि समजूतदारपणा यामुळे तणावाचे प्रसंग सहज हाताळता येतात.
(५) कर्तव्यनिष्ठा आणि आत्मसन्मान:
स्त्रीने कोणत्याही क्षेत्रात काम करताना कर्तव्यनिष्ठा आणि आत्मसन्मान जपला पाहिजे. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणे आणि योग्य तेच करणे ही स्त्रीची खरी ओळख असायला हवी.
३) आजच्या जीवनात संस्कारांचे महत्त्व :-
(१) कुटुंब व्यवस्थेतील स्थैर्य:
संस्कारित स्त्री आपल्या कुटुंबात संयम, प्रेम आणि आदराची भावना निर्माण करते. तिच्या विचारसरणीवर संपूर्ण कुटुंबाचा पाया अवलंबून असतो.
(२) सामाजिक संतुलन:
स्त्रिया ज्या समाजात सुसंस्कृत असतात, तो समाज अधिक प्रगल्भ आणि आदर्शवत असतो. संस्कारांमुळे स्त्रिया सकारात्मक विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि संयम ठेवू शकतात.
(३) पुढील पिढी घडविणे:
"जसे संस्कार, तसे विचार, तसे जीवन" या न्यायाने मुलांवर होणाऱ्या संस्कारांची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रीवरच असते. सुसंस्कृत आई असेल, तर समाजात आदर्श नागरिक घडतात.
(४) व्यावसायिक जीवनातील यश:
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रखर बुद्धीबळ आणि कष्टसोबत संयम, चांगले वर्तन आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. ही मूल्ये मिळविण्यासाठी स्त्रीच्या संस्कारांची आवश्यकता असते.
🍫४) आधुनिक महिलांसाठी काही आवश्यक गुण :-
आजच्या काळातील स्त्रीने आधुनिकतेसह संस्कारही जपले पाहिजेत. त्यासाठी तिला पुढील गुण आत्मसात करावे लागतील –
✅ शिक्षण आणि ज्ञान: साक्षर आणि हुशार असणे महत्त्वाचे.
✅ स्वतंत्र विचारसरणी: योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी.
✅ संस्कार आणि विनम्रता: नम्र आणि सुसंस्कृत वर्तन असावे.
✅ कर्तव्यभावना: जबाबदारी पार पाडण्याची जाणीव असावी.
✅ स्वावलंबन: कोणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनावे.
✅ आत्मसन्मान: स्वतःच्या अस्तित्वाचा आदर ठेवावा.
५) महिलांच्या सशक्तीकरणासाठी उपाय :-
आजच्या युगात महिलांचे सशक्तीकरण करणे ही समाजाची मोठी गरज आहे. यासाठी खालील उपाय महत्त्वाचे आहेत –
✔️ शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन: महिलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.
✔️ सुरक्षितता आणि कायदे: महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे असणे आवश्यक आहे.
✔️ समान संधी: प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान संधी मिळायला हव्यात.
✔️ समाजाची मानसिकता बदलणे: स्त्रियांकडे केवळ जबाबदारी म्हणून न पाहता त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला पाहिजे.
६) अर्थात / सार :-
आजच्या काळात महिलांचे वर्तन आणि संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्त्री ही समाजाचा कणा असून तिचे सन्मानाने जीवन जगणे, संस्कारयुक्त राहणे आणि समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवून, आधुनिक युगाशी जुळवून घेताना आपल्या संस्कारांची, कर्तव्याची आणि जबाबदारीची जाण ठेवली पाहिजे.
स्त्रीशक्तीचा आदर आणि सन्मान केल्यानेच समाज अधिक सुसंस्कृत, प्रगत आणि समृद्ध होईल. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, महिलांचा गौरव करुया आणि त्यांच्यातील शक्तीला सलाम करूया!
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share




No comments:
Post a Comment