"...आमची गुढी, शैक्षणिक गुढी..." गुढीपाडवा, प्रवेश वाढावा..."जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद )ता. बागलाण जि. नाशिक येथील शाळेत आज वार: शनिवार दिनांक :29/03/2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा.
*जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद ) येथील शाळेत आज वार: शनिवार दिनांक :29/03/2025 रोजी "...दप्तरमुक्त शनिवार..." अंतर्गत शाळेत"...आमची गुढी, शैक्षणिक गुढी..." गुढीपाडवा, प्रवेश वाढावा..." अशा स्लोगन म्हणतं विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात, आनंदात शाळेत गुढी सजवून विविध फुले, गुलाब, चाफा यांच्या फुलांच्या माळी घालून,निंबांचे पानाची दहाळी, आणि विविध शैक्षणिक साहित्य, अक्षर पाट्या, शब्द पट्ट्या, इंग्रजी शब्दाचे तोरण,मराठी शब्दाचे तोरण,गणित उदा.चे तोरण,व इतर विषयांचे शब्द पट्ट्या वापराण्यात आल्या. व गुढीला पताकांनी सजवण्यात आले. त्या नंतर मुख्याध्यापक गणेश महाले यांनी नंतर गुढीचे हळद, कुंकूने व पुष्प देऊन पूजन करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी, शिक्षिका सुनीता भामरे, अनिता क्षीरसागर यांनी गुढीचे पूजन केले.यात सर्व विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा सहभाग होता. तसेच नंतर विदयार्थ्यांचे मुख्यध्यापक गणेश महाले यांनी पुस्तकांचे वाचन घेण्यात आले .💐💐💐💐*
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share


No comments:
Post a Comment