जिल्हा परिषद शाळा कठगड येथील शिक्षक गणेश
महाले यांची 31 वर्ष सेवा  निमित्ताने विद्यार्थ्यांना फळं व चॉकलेट वाटप. 


( शाळेविषयी बातमी बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. )



आज वार :सोमवार दिनांक :21/10/2024 रोजी श्री.गणेश शंकर महाले हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड (ताहाराबाद ) ता.बागलाण जि.नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांच्या सेवचे 31 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केळी, केक, कॅटबरी व माही केक सेंटर ताहाराबाद तर्फे चॉकलेट फ्री दिले. यावेळी ग्रामस्थ श्री. किरण घांगुर्डे, संदीप गांगुर्डे, पोपट मोरे माजी. उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,रोहित घांगुर्डे,व इतर ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षिका सुनीता भामरे, मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी कविता वारुळे यांनी शाल, श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सर्व विदयार्थानी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. 

   त्यांना आता पर्यंत विविध पुरस्कारांनी संन्माणित केलेले आहेत.

1) महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार , 
2) जिल्हा परिषद ,धुळे तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,
3)  साक्री तहसिल तर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती वर्ष 2010 निमित्ताने तालुका आदर्श पुरस्कार , 
4) महाराष्ट्र शिक्षक संघ ,धुळे तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार , 
5) अखिल भारतीय विकास अकॅडमी ,मुंबई राष्ट्रीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार , 
6) महाराष्ट्र मनुष्यबळ विकास अकॅडमी ,मुंबई. राज्य आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार ,
7)  कोरोना योद्धा पुरस्कार ,सटाणा, 
8) रोटरी क्लब नाशिक तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, 
9) भारतीय हिंदूरत्न पुरस्कार, 
10) युवा ध्येय राष्ट्रीय संशोधक शैक्षणिक समाज रत्न पुरस्कार 
   
       इत्यादी पुरस्कारांनी संन्माणित केलेले आहेत. 

    *  सध्याच्या शाळेत आठ वर्षे दोन महिने सेवा झाली आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जिल्हा परिषद शाळा वडपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथे दिनांक 21.10. 1993 रोजी रुजू झाले. नऊ वर्ष नऊ महिने अति दुर्गम आदिवासी भागातील डोंगराळ भागांमध्ये या ठिकाणी रस्त्याची व विजेची सोय नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्या गावात राहून त्यांनी मुलांना शैक्षणिक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावली. स्वच्छ सुंदर शाळा तयार केली व मुलांना शाळेत येण्यास प्रवृत्त केले मुलांना शाळेत येण्याची गोडी लागल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांना शिस्त व अभ्यास करण्याची सवय लावली. पटनोंदणी व उपस्थिती 100% त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीस मदत झाली अन त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी त्या शाळेत यायला लागले व शाळेची पटसंख्या वाढीस मदत झाली त्या पंचक्रोसित चालू लागली. ते शिक्षक स्थानिक त्या गावातच राहत असल्याने संध्याकाळी विद्यार्थ्यांना पुन्हा सहा ते सात एक तास अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांच्या ओट्यावर गटागटाने अभ्यास करण्यास नेमून दिलेल्या ठिकाणी गटप्रमुख विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत होते. संध्याकाळी दररोज शिक्षक त्यांचा अभ्यास तपासत होते. या उपक्रमामुळे शाळेत शिकवलेला अभ्यास विद्यार्थी संध्याकाळी तो अभ्यासाचा सराव करत होते.. या उपक्रमामुळे शाळेची गुणवत्ता वाढीस मदत झाली. 

           या शाळेवर असताना राष्ट्रीय कामांमध्ये काम करीत असताना पल्स पोलिओ ड्युटी करत होते. त्यादिवशी अचानक बोलावणं आलं त्या शिक्षकांना घेण्यासाठी गाडी पाठवण्यात आली होती. ते राष्ट्रीय काम सोडून जात नव्हते.परंतु घ्यायला आलेल्या व्यक्तीने विनंती केली की कोणीतरी मोठी व्यक्ती अधिकारी आलेली आहे तुम्हाला बोलावले आहे त्यांना जावं लागलं. त्या देवळीपाडा या गावी आदिवासी कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री गोविंदराव चौधरी शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने तेथे जमलेले खासदार, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते त्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 

     त्यानंतर त्या शिक्षकांची बदली जिल्हा परिषद शाळा काकशेवड तालुका साक्री जिल्हा धुळे येथे बदली झाली. ही त्यांची दुसरी शाळा होती या शाळेवर रुजू झाल्यानंतर या शाळेत एकूण पाच शिक्षक स्टॉप होता. मुख्याध्यापक रिटायर झाल्यानंतर त्या शिक्षकांकडे मुख्याध्यापक चार्ज आला. आणि ह्या शाळेवर देखील त्या शिक्षकांनी मोठ्या उत्साहात विविध शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. 

* उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष उपक्रम  राबविण्यात आले. 

1) दररोज शाळेत येणाऱ्या ला बक्षीस.

2) शुद्धलेखन सुंदर असणाऱ्या लाभ बक्षीस 

3) गृहपाठ पूर्ण करणाऱ्याला बक्षीस 

4) पाढे पाठांतर करणाऱ्याला बक्षीस.

5) इंग्रजी शब्द पाठ करणाऱ्याला बक्षीस.

6) गणिती क्रिया करणाऱ्याला बक्षीस .

7) वाचन करणाऱ्यांना बक्षीस .

                असे विविध उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्यांना सिस पेन्सिल,पेन, वही, खोडरबर, पट्टी, उजळणी पुस्तक, मुलींना रेबिन, अशा अनेक वस्तू भेट रूपांनी त्यांना देत होते. हा उपक्रम 2006 पासून राबविण्यात येत होते. या उपक्रमामुळे शाळेच्या उपस्थिती, गुणवत्ता वाढीसाठी खूप मदत झाली. 

* विविध क्षत्रिय भेटी देऊन विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य यांची जाणीव  :व्हावी म्हणून शेजारील कुडाशी या गावातील 

1) पोस्ट ऑफिस ला भेट व त्या पोस्टाचे कार्य विद्यार्थ्यांना समजून सांगितले.

2) जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा,कुडाशी येथे विद्यार्थ्यांना घेऊन बँकेची व्यवहाराबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. बँकेतील व्यवहार कसे केले जातात. यांविषयी मॅनेजर साहेबांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 

3) हॉटेल व्यवसायाबद्दल हॉटेलला भेट देऊन विद्यार्थ्यांना हॉटेल मालक सुनील चौधरी यांच्याशी संवाद साधला.

4) फोटोग्राफर स्टुडिओ भेट. या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवसाय बद्दल हिरे सरांनी माहिती दिली. 

5) प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाशी भेट- या आरोग्य केंद्रात भेट दिल्यानंतर डॉक्टर घरटे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य बद्दल माहिती दिली.

6) शैक्षणिक सहल- बारीपाडा येथील गावाला भेट गावात चैत्राम पवार हे सामाजिक कार्यकर्ते यांनी राबवलेले उपक्रम वनरक्षण वृक्षांची लागवड यांची पाहणी करण्यासाठी तेथील डोंगराच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची पाहणी केली.वृक्षांचे रक्षण संवर्धन पर्यावरणाचे रक्षण करणे. आपल्या हिताचं आहे. याची माहिती श्री महाले यांनी दिली. 

* वनभोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास सहभाग घेतला. 

त्यानंतर बारीपाडा ता. साक्री जि.धुळे.गावात आल्यावर गावातील विविध प्रकल्प:

1)  बायोगॅस वर चालणारी वीज यंत्रणा त्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. वीज संपूर्ण गावांमध्ये प्रत्येकाच्या घरी जोडलेले कनेक्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले यामधून पैशाची बचत गावाचा एकोपा एक संघभावना. राष्ट्रीय मुलांची जोपासना त्या गावात दिसून आली.

2)  मधुमक्षिका पालन - प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्या मधुमक्षिकांचं निरीक्षण केले. हा एक व्यवसाय करू शकतो याची माहिती देण्यात आली. 

* असे अनेक विविध उपक्रम राबवून महाले सरांना काकशेवड शाळेवर असताना उत्कृष्ट कामाबद्दल दोन अतिरिक्त वेतन वाढी मिळाले आहेत. तसेच सन 2010 / 11 जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मिळाला आहे. तसेच त्याच वर्षी तहसील साक्री मार्फत महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. व या शाळेवर असताना 2011/ 12 ला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला आहे. या शाळेवर महाले यांनी नव वर्ष नऊ महिने इतकी सेवा केली. तसेच सन 2013 /2014 यावर्षी बदली जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा येथे बदली झाली. अतिदुर्गम भागातील आदिवासी वस्ती असणारी 100% भिल समाज असणारी ही शाळा अतिशय दुर्लक्षित होती. मी आल्यानंतर प्रथम विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने सहा महिने शिस्त किंवा शिक्षा केली नाही. पाच विद्यार्थी उपस्थिती नसताना पहिल्याच वर्षी 40 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. पटसंख्या वाढल्याने पहिल्या वर्षी एक शिक्षक नवीन मिळाला. व हळूहळू दिवाळीनंतर सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावली. असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रवृत्त केले. दुसऱ्या वर्षी 60 (साठ) विद्यार्थी दाखल करून पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे अजून एक नवीन शिक्षक रुजू झाला. यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीस मदत झाली. तिसऱ्या वर्षी सहावीचा वर्ग सुरू केल्याने. शाळेच्या पटसंख्यावाढीस मदत झाली . पाचवा नवीन शिक्षक मिळाला. आत्ता शाळेची पटसंख्या 170 झाली होती. पाच शिक्षक स्टॉप झाला. यामुळे अधिकच गुणवत्ता वाढीस मदत झाली. ही शाळा 1996 नंतर अतिशय दुर्लक्षित झालेली होती. मी रुजू 2013 ला झाल्यापासून अगदी नेहमीच सुरू झाली. व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे लागले. तसेच 2015 ला गावाती  लोकवर्गणीतून 1,05,000/-रुपये किंमतीचे एक नवीन प्रोजेक्टर घेतले त्यामुळे शाळेच्या गुणवत्तासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी. खुपचं उपयोग झाला. सन 22 जून 2016 ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद शाळा कठगड ( तहाराबाद ) तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे रुजू झाले येथील वस्ती ही 100% भिल्ल वस्ती असलेली शाळा. अतिशय शिक्षणापासून दुर्लक्षित पालकांना शिक्षणाची गोडी नसलेले कसलंही शिक्षणाची आवड निवड नसणारे पालक वर्ग शाळेला कसली मदत न करता आपापल्या कामांमध्ये हात मजुरी मोल मजुरी सकाळी आपल्या कामाला निघून जातात. आणि म्हणून विद्यार्थ्यांकडे त्यांच्या पालकांचे लक्ष राहत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळलेली असते त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पालक घेऊन न दिल्यामुळे विद्यार्थी गुणवती पासून दुर्लक्षित होता. त्यांची राहणीमान वागणं बोलणं व्यवस्थित नव्हते. महाले यांनी विद्यार्थ्याने शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मागील प्रमाणे उपक्रमाला सुरुवात केली रोज येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देणे नीटनेटके येणाऱ्या बक्षीस देणे. सुरुवात केली. हळूहळू विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढायला लागली. व विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे मन लागायला लागलं आणि मग शाळेची गुणवत्ता वाढीस मदत झाली प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी बक्षीस दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होते व विद्यार्थी नियमित शाळेत येतो त्यामुळे शंभर टक्के पट्ट नोंदणी व उपस्थिती वाढीस मदत होते. या पद्धतीने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. 100% पट नोंदणी व उपस्थिती, मुलाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या उजळणी पुस्तक पेन वाटप वनराई बंधारे, क्षत्रिय भेटी, भौगोलिक सहली, ऐतिहासिक सहली,वाचन उपक्रम, हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव, वृक्षारोपण- एक विद्यार्थी एक झाड, संगणक साक्षरता, प्रौढ शिक्षण, कुटुंब कल्याण, चावडी वाचन, बाल आनंद मेळावा, किशोरी मेळावा, पालक मेळावा, महिला मेळावा, राष्ट्रीय सण, जयंती व पुण्यतिथी, दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,नृत्य स्पर्धा, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. वन संवर्धन जंगलात भेट, सेवाभावी वृत्तीने जनजागृती.तंटामुक्त गाव यामध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे, एड्स जागृती. व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा, लोकसंख्या नियंत्रण, एक गाव एक गणपती, हळदी कुंकू व्यवसायिक मार्गदर्शन, क्षत्रिय भेटी, गळती स्थगिती, गोष्टींचा शनिवार, डिजिटल शाळा, ई लर्निंग, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा. पारावरची शाळा, ओट्या वरची शाळा, गल्ली मित्र, अभ्यास मित्र, शाळा बंद पण शिक्षण सुरू, विदयार्थ्यांची बचत बँक, नवीन तंत्रज्ञानानुसार अध्ययन अध्यापन मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, टीव्ही या साधनांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी स्वतःच्या आवाजात सीडीद्वारे अध्यापन. अशी विविध उपकरणाहून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीस उल्लेखनीय काम केले आहे.तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्व व आरोग्याचे महत्त्व वेळोवेळी पटवून दिले आहे. गावातील महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना मार्गदर्शन केले आहे. तंटामुक्त काम केले आहे. शाळेच्या भौगोलिक सुविधांसाठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक मदत लोकांकडनी लोकवर्गणीतून शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना व शाळेला मदत झाली आहे. 

* राष्ट्रीय कामात उल्लेखनीय काम केले आहे. 

(1) जनगणना,   (2) नवीन मतदार नोंदणी, (3) इलेक्शन ड्युटी, (4) कोरोना काळातील ड्युटी, (5) कोरोना सर्वेक्षण*

   *🌱 वसुंधरा वाचवा! उपक्रम! 🌴 मी श्री. गणेश शंकर महाले प्राथमिक शिक्षक हल्ली ची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड (ताहाराबाद ) ता. बागलाण जि. नाशिक या शाळेवर शालेय परिसरात 2018 ला स्वतःच्या कार मध्ये 101 विविध फळे, फुले, पिंपळ, वड, इतर जातींचे वृक्षाची ची रोपे आणून शाळेचं आवारात लावले आहेत. आज वृक्षसंवर्धन करून ते खुपचं मोठे झाले आहेत. तसेच यापूर्वीची शाळेत पण वृक्षारोपण केल आहे.


* माझी पहिली शाळा :

1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडपाडा (पिंपळगाव बुद्रुक) ता. साक्री जि.धुळे.येथे 1995 ला वृक्षारोपण केले होते. तिथे रस्त्याला लागून शाळा असल्यामुळे जागे अभवी फक्त 31 झाडे विविध फुलांची व फाळांची आणि इतर जातीची झाडे लावण्यात आली होती. पण त्याठिकाणी माझा वृक्षारोपण चा उपक्रम यशस्वी झाला नाही तिथं शाळा रस्त्यावर असल्याने त्या गावातील बकरी, बैल, गाय, इतर जाणवरे तिथंच प्रथम जमा करायचे नंतर चारायला घेऊन जात होते. म्हणून सर्व केलेले वृक्षारोपण वाया गेले. एक वृक्ष जगवू शकलो नाही. 🥦🌴 

* माझी दुसरी शाळा :

  2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,काकशेवड ता. साक्री जि.धुळे.येथे ही 2005 ला वृक्षारोपण केले होते इथे फ़ॉरेस्ट नर्सरी मधून 111वृक्ष आणले होते.तिथे वृक्षारोपण करण्यासाठी जागा कमी असल्याने शाळेसमोर पहिले तार कंपाउंडसाठी व सिमेंटी पोल 4000/- ₹. आणि तार 4000/-₹. असे ₹.8000/-खर्च करून कंपाउंड केले. नंतर 111 वृक्षारोपण केले पण शाळेच्या मागे कंपाउंड नसल्याने मागील झाडे वाचवू शकलो नाही.फक्त 56 झाडे संवर्धन करण्यात आले होते. 🥦🌴 

* माझी तिसरी शाळा: 

3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चिंचपाडा (पानखेडा) ता. साक्री जि.धुळे.येथे ही 2013 ला वृक्षारोपण केले होते.गंतुरी लावून प्रथम कंपाउंड केले होते. याठिकाणी बैलगाडीने 4 बैल गाडी ने गंतुरी कापण्याची मजुरी ₹.2000/- व बैलगाडीने वाहतूक करण्याची मजुरी ₹.2000/- असे एकूण ₹ 4000/- रुपये स्वतः खर्च केले होते. व तिथे ही 151 झाडे लावण्यात आली व 70 वृक्ष संवर्धन केले होते. 🥦🌴 

माझी चौथी शाळा :
 
4) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड (ताहाराबाद ) ता. बागलाण जि. नाशिक या शाळेवर शालेय परिसरात 2018 ला स्वतःच्या कार मध्ये 101 विविध फळे, फुले, पिंपळ, वड, इतर जातींचे वृक्षाची रोपे आणून शाळेचं आवारात लावले आहेत. आज वृक्षसंवर्धन करून ते खुपचं मोठे झाले आहेत. तसेच यापूर्वीची शाळेत पण वृक्षारोपण केल आहे.🥦🌴 

असे वरील विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य व शाळा गुणवत्ता वाढीसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण, लौकिक, उल्लेखनीय काम केले आहे..धन्यवाद! 🙏🏻



























Share