https://jaymalharnews.com/details.php?news=15952
*विद्यार्थिप्रिय व उपक्रमशील गणेश महाले यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*
उपक्रमशील गणेश महाले यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*
धुळे (प्रतिनीधी):- 02 ऑक्टोंबर 2024 रोजी युवा ध्येय व उदयोग समूह नाशिक विभागीय कार्यालया यांच्या मार्फत महाकवी कालिदास कलानाट्य मंदिर, शालिमार नाशिक येथे " उपक्रमशील शिक्षक गणेश महाले यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमुख पाहुणे दिनकर टेमकर (शिक्षण संचालक प्राथमिक) यांच्या हस्ते प्रदान कारण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे (ज्येष्ठ संपादक व लेखक), प्रमुख वक्ते दिनेश आदलिंग (लेखक व मोटिवेशनल ट्रेनर, स्वयंप्रेरणा पुस्तकाचे लेखक), प्रमुख उपस्थिती धामणे (मा.शिक्षण अधिकारी), संदीप वाकचौरे (शिक्षण तज्ज्ञ), सुनील बेनके, (अध्यक्ष बेनके ट्रस्ट, पुणे), श्रीकृष्ण कुलकर्णी (विभागीय जर्नलि्झाम भोसला मिलिटरी कॉलेज नाशिक), महाले, अण्णा सदगीर (उद्योजक), दिलीप बिन्नर (अध्यक्ष सिल्वर लोटस स्कूल) व लहानू सदगीर (संपादक, युवा ध्येय व अध्यक्ष,ध्येय उद्योग समूह) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आदर्श शिक्षक गणेश शंकर महाले यांची शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय काम केले आहे. ते सदैव विदयार्थीप्रिय राहिले आहेत. ते विद्यार्थी व गुणवता वाढीसाठी सतत विविध उपक्रम राबवित असतात. त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे. त्यांनी, सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यात मोठा सहभाग आहे. तसेच त्यांची वृक्षारोपण व संवर्धन हा आवडीचा विषय आहे. त्यांनी प्रत्येक शाळेत वृक्षारोपण व संवर्धन केले आहेत. सध्या कार्यरत शाळा जिल्हा परिषद कठगड (ताहाराबाद) ता. बागलाण जि. नाशिक आहेत.
त्यांच्या जीवनातील ध्येय देशातील भावी पिडीला मूल्यवर्धित, सुजाण, आदर्श नागरिक घडवणे. त्यांचा समाजाला संदेश देऊ इच्छिता : समाजाने आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माणुकीचे धडे, चांगले विचार, वर्तन, परोपकार, कर्तव्य, शिक्षण, नाते संबंध दोघी बाजूनी जपावी लागतात. तेव्हा नाते संबंध टिकतात. याची जाणीव करून द्यावी. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपलं आयुष्य सुंदर जगेल. त्यांचे या क्षेत्रातील उपक्रम राबवल 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती टिकवने राष्ट्रीय कामात सहभाग मतदार नोंदणी, इलेक्शन ड्युटी, मतदार ओळखपत्र तयार करणे. कुटुंब कल्याण,प्रौढ शिक्षण, राष्ट्रीय जनगणना, वृक्षारोपण व संवर्धन, शैक्षणिक गुणवता वाढीसाठी विशेष उपक्रम, उपस्थिती वाढविण्यासाठी रोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थांसाठी बक्षिसे, गुणवता वाढीसाठी गृहपाठ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांसाठी बक्षिसे, पाढे पाठ करण्याऱ्या विद्यार्थांसाठी बक्षिसे, इंग्रजी शब्द पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे, परिपाठत गोष्ट सांगणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षिसे, सुंदर शुद्धलेखन असणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षिसे, शाळेत विदयार्थ्यांची बचत बँक.(यामुळे विद्यार्थ्यांना पैशाची बचतीचे महत्व समजते. विदयार्थीच आर्थिक व्यवहार नोंदी ठेवतात. खाऊंचे पैसे शाळेतील बचत बँकेत जमा करतात. आणि जेव्हा वही, पेन इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ह्या पैशाचा वापर करतात. स्थलांतरित विदयार्थी शिक्षण प्रवाहात आणले. आदर्श विदयार्थी पुरस्कार /आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार. (या उपक्रमांतर्गत आदर्श आणि जबाबदार नागरिक घडविण्यास प्रोत्साहन मिळते.) डिजिटल स्कूल, ई-लर्निंग, शिष्यवृत्ती परीक्षा तंबाखू मुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा, क्षेत्रीय भेटीतून व्यावसायिक मार्गदर्शन, बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, गोष्टींचा शनिवार, शाळा बंद, पण शिक्षण सुरु.(कोरोना काळातील) शिकूया आनंदे, नवीन तंत्रज्ञानाचा अध्ययन -अध्यापनात वापर स्वच्छ शाळा, सुंदर शाळा. महावाचन अभियान, विविध स्पर्धा रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, चावडी वाचन, पालक मेळावा, गल्ली मित्र, अभ्यास मित्र. यांना मिळालेले बक्षिसे/पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद, धुळेतर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार. साक्री तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्रामगौरव पुरस्कार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, आखिल भारतीय समाज विकास अकेडमी, मुंबई तर्फे राज्य गुणिजन गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार, करोना योद्धा पुरस्कार. सटाणा, रॉयल रोटरी क्लब, नाशिक तर्फे नेशन बिल्डर पुरस्कार, भारतीय हिंदूरत्न पुरस्कार, राष्ट्रीय संशोधक शैक्षणिक समाज रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र गुणिजन गौरव पुरस्कार, ग्लोबल आयकॉन अवॉर्ड, त्याच्या बद्दल विशेष उल्लेखनीय बाबी तंत्रस्नेही व विदयार्थीप्रिय, आदर्श शिक्षक तसेच अतिरिक्त 5 इन्क्रिमेंट्स मिळालेल्या आहेत. त्यांचे ध्येयच आहे. विद्यार्थीनां मानवतावादी, संस्कार युक्त, सुजाण, आणि आदर्श नागरिक घडवणे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Share







No comments:
Post a Comment