*जि.प.शाळा, कठगड (ताहाराबाद) ता. बागलाण जि. नाशिक येथील शाळेतील विदयार्थ्यांचे गावातील प्रमुख ठिकाणी पारावर पालक व ग्रामस्थ समक्ष "... चावडी वाचन..."
*निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कठगड (ताहाराबाद) येथे आज दिनांक -20/5/2025 वार -मंगळवार रोजी कठगड गावातील वडाच्या झाडाखाली पारावर विद्यार्थ्यांचे. "...चावडी वाचन..." घेण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक गणेश महाले यांनी प्रास्ताविक केले. व चावडी वाचनाचे महत्व, व अत्यावशकता का? आहे. आणि आज विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, भाषण, संभाषण,संख्याज्ञान, संख्यावरीलक्रिया ह्या मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे? महाराष्ट्र शासनाचे दिनांक :5 मार्च 2025 रोजी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम जाहीर केला. या कृती कार्यक्रमानुसार वर्गातील किमान 75% विदयार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त व्हाव्यात. हे ध्येय ठरून दिले आहे.इयत्तेनिहाय अभ्यासक्रमातील क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत. म्हणून "...समर कॅम्प 2025..." या अभियान अंतर्गत दिनांक -20 मार्च 2025 ते दिनांक -30 जून 2025 अखेर कृती कार्यक्रम अंतर्गत कृती पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. हया कृती पुस्तिका प्रत्येक विद्यार्थीना देण्यात आल्या आहेत. आणि यांच्या मार्गदर्शना साठी गावातील स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. तसेच शिक्षक भेटी देऊन विद्यार्थ्यांना व स्वयंसेवक यांना मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकांच्या हस्ते पुष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक वर्ग, ग्रामस्थ,शिवाजी मोरे, विनोद सोनवणे,शंकर मोरे, मधुकर सोनवणे, चंदू सोनवणे, सोनू भामरे, सोमनाथ सोनवणे, लक्ष्मी सोनवणे, सुनिता पवार,गंगाधर पवार, अंबु सोनवणे, अनिल माळी, रामचंद्र सोनवणे, बापू मोरे, भुऱ्या सोनवणे, अनिल सोनवणे, रामा पवार, अण्णा पवार,तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षिका सुनीता भामरे.यावेळी ग्रामस्थांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले व आनंद व्यक्त केला. तसेच मुख्याध्यापक गणेश महाले यांनी पालकांनाचे, ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व आभार मानले.💐धन्यवाद!**
************************************************************************************
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share






No comments:
Post a Comment