शिक्षक बदली संदर्भात शासन निर्णय व परिपत्रके ( जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली परिपत्रके - PDF व ऑनलाईन पोर्टल लिंक. )
https://ott.mahardd.com
*******************************************
🔁 *OTT Support numbers :-*
ऑनलाईन बदलीबाबत vinsys सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्वाचे नंबर
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.
@ Email :- ottsupport@vinsys.com
************************************************
शिक्षकांनी अपील /आक्षेप कसे करावे? मार्गदर्शनावर खालील लिंकला क्लिक करून सविस्तर व्हिडीओ पहा.
https://youtu.be/btKgqgJvU9g?si=ASFxwzPV1f_7cLzX
******************************************
*दि 8 ऑगस्ट 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*संवर्ग चार मधील बदलीपात्र शिक्षकांना बदली फॉर्म भरणे करीता मुदतवाढ मिळणार :- ग्राम विकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांची ग्वाही.*
____________________________
काल रात्रीपासून बदली पोर्टल अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बदली फॉर्म भरताना संवर्ग चार मधील शिक्षक बंधू-भगिनींना खूप त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत फक्त दहा ते पंधरा टक्के शिक्षकांचे बदली फॉर्म भरून झालेले आहेत. तसेच राज्यभर PAT ची परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षकांना बदली प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मा. श्री. केशवराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. संवर्ग चार मधील बदलीपात्र शिक्षकांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना बदली फॉर्म भरण्यासाठी दोन दिवसाची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. या मागणीस मंत्री महोदयांनी तात्काळ संमती दर्शवली व दोन दिवसाची मुदतवाढ देऊ अशी ग्वाही दिली. शिक्षक संघाच्या मागणीस मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बदली फॉर्म भरणेकरिता निश्चितपणे मुदतवाढ मिळेल अशी खात्री वाटते.
******************************************
*दि 2 ऑगस्ट 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली प्रक्रियेतील अतिशय सर्वात महत्त्वाचा आणि 90% ज्या टप्प्यात बदल्या होणार आहे असा संवर्ग 4 बदली टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्यापूर्वी.*
*1) दिनांक 03.08 2025 रोजी संवर्ग 3 म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली झालेल्या याद्या प्रसिद्ध होतील.*
*2) दिनांक 04.08.2025 रोजी बदली पात्र म्हणजेच संवर्ग 4 चार साठी रिक्त पदांची यादी घोषित होईल.*
*3) दिनांक 05.08 2025 ते 08.08.2025 पर्यंत बदलीसाठी प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे.*
*महत्त्वाची विनंती*
*बदली नोकरीतील अविभाज्य घटक आहे त्यामुळे बदलीच्या बाबतीत कोणीही पॅनिक होऊ नका. कारण साहजिकच आहे कुठलाही बदल स्वीकारण्यास आपल्याला काही वेळ लागतो कालावधी जाऊ द्यावा लागतो. परंतु जास्त सतत बदलीचा विचार केल्याने आपल्या कुटुंबावर व आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. फक्त अभ्यासपूर्ण गावे भरणे आपल्यावरील सेवा जेष्ठ शिक्षकांनी भरलेला पसंती क्रम बघणे आणि आपली अपेक्षित सेवा जेष्ठता बघून अपेक्षित गावे भरणे यामध्ये आपले कसब आणि कौशल्य अवलंबून आहे. गावे भरण्यासाठी स्वतः अभ्यास करा गावांची यादी तयार करा आपल्यावरील सेवाजेष्ठ शिक्षकांची यादी तयार करा कोण कुठे घेऊ शकतो याचा अंदाज लावा त्यानंतरच प्राधान्यक्रम भरा प्राधान्यक्रम भरण्याच्या अगोदर आपल्याजवळ त्याची यादी यु-डायस कोड सह तयार ठेवा. यातून निश्चितच आपल्याला अपेक्षित शाळा मिळेल त्यामुळे स्वस्थ रहा मस्त रहा*
********************************
*दि 29 जुलै 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*संवर्ग 3 साठी रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी यांच्या लॉगिनला नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.*
बदली पोर्टलवर संवर्ग 3 साठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू होणार आहे कालावधी 28.07.2025 ते 31.07.2025 आहे तरी संवर्ग 3 मधील बदली अधिकार पात्र शिक्षक बंधू या कालावधीत आपला फॉर्म पसंतिक्रम भरून फॉर्म आपला सबमिट करू शकतात.
1) अवघड क्षेत्रातील शिक्षक बांधव बदलीसाठी होकार नकार देऊ शकतात.
2) अवघड क्षेत्रातील बांधव पती-पत्नीसाठी एक युनिट करू शकतात.
3) अवघड क्षेत्रातील शिक्षक बांधवांना 30 पसंती क्रम भरणे अनिवार्य आहे.
********************************
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक शंका समाधान*
*दि 28 जुलै 2025*
*➡️ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग 3 वर्ष सेवा एक किंवा अनेक शाळांवर पूर्ण केलेली आहे.अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदली करिता अर्ज करता येईल (GR 1.7.1)*
*➡️बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवाजेष्ठतेचा विचार केला जाणार नाही* (GR 4.4.3)*
*➡️ अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील. (GR 4.4.4)*
*➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील सामानिकरणा व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील.(GR 4.4.5)*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर बदली करिता होकार (Yes )किंवा नकार (No )देण्याची सुविधा उपलब्ध असेल*
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजेच No निवडून आपला फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही*
*If teacher has selected "Willing for transfer" option as "No" then he will not get transferred in entitled round.*
✳️ *तसेच ज्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे Yes निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही*
*If he selects option "Yes" then he will be transferred as per his choices and availability of vacancies, and if no choice available then he will not get transferred in Entitled Round.*
*➡️ ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये*
*➡️तरीसुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टलवर होकार (Yes ) किंवा नकार (No ) देण्याची सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार (No ) देऊन फॉर्म सबमिट करावा येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही. यामध्ये आपली बदली होणार नाही*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार( Yes)नोंदवून 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा आपण बदली करिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपणास शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल (GR 4.4.6)*
*➡️अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना शाळेवरील किंवा त्या क्षेत्रातील तीन वर्ष सेवा अनिवार्य नसेल तसेच यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊन 31 मे 2025 पर्यंत तीन वर्ष पूर्ण झालेले असतील तर असे शिक्षक पुन्हा संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊ शकतात (शा आ.दि.21/2/19 व परिपत्रक दि.2/04/25 नूसार)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल (GR 4.2.6)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फार्म सबमिट होणार नाही (GR 3.2)*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदली पात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात.(GR 4.4.5)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पती-पत्नी एक युनिट मधून घेतलेली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या अवघड क्षेत्रामध्ये पती-पत्नी च्या शाळांचे अंतर 30 किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)*
✳️ *बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पत्ती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकाचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 30 किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)*
*➡️ बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर चा लाभ घेताना दोघांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे*
*➡️ पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत एक युनिटचा लाभ घ्यायचा असल्यास दोन्हीही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण असणे आवश्यक आहे*
*➡️ बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर युनिट चा लाभ घेताना जोडीदार बदली अधिकार प्राप्त, बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसेल किंवा बदली पात्र नसेल तरीही घेता येतो*
*➡️ वन युनिट अंतर्गत प्राधान्यक्रम देताना कोणतेही तालुक्यातील प्राधान्यक्रम देऊ शकतात*
*➡️ एक युनिट चा लाभ घेताना जोडीदाराला सेवेची अट नाही*
➡️ *एक युनिट अंतर्गत बदली घेताना फक्त जो शिक्षक एक युनिट करिता अर्ज करतो* *त्यांच्याच प्राधान्यक्रमातून दोघांनाही शाळा दिल्या जातात*
*या ठिकाणी जोडीदाराला अर्ज करण्याची गरज नाही*
*➡️ मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*
*➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांना दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.*
*➡️ पूर्वानुभावाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार पात्र शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदली पात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरिता प्रकाशित करण्यात आलेली असेल सदर यादींचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या सेवाजेष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेला प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लाऊन आपल्याला त्यातल्या त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपण आपला फार्म भरवा अशा शाळांचा यु डायस क्रमांक नोंदवून त्याचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाची ही वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विन्सेस ने दिलेल्या सूचना व शासन निर्णय यांचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा.*
******************************************
**दि. 27 जुलै 2025*
*जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025*
*बदली अधिकार प्राप्त शिक्षक*
*( विनंती बदली प्रकार )*
1️⃣ *संपूर्ण बदली प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक होय.*
2️⃣ *सुधारित जी.आर. मध्ये झालेला मूलभूत बदल म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक होय.*
3️⃣ *दुर्गम क्षेञातील सलग तीन वर्ष सेवा करुन ,बदलीची सुवर्णसंधी साधणारा संवर्ग म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक होय.*
4️⃣ *नोकरीतील खडतर प्रवास म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक होय.*
5️⃣ *बदली ऑनलाईन फाॅर्म भरताना खूप काळजीपूर्वक, दक्षतेने भरणे खूपच आवश्यक ठरते.*
6️⃣ *बदली पोर्टलवरील केलेली एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते.*
7️⃣ *बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचे तीन उपभाग आहेत.*
8️⃣ *उपभाग खालील प्रमाणे*
*A) संवर्ग 3 व संवर्ग 4 ( दुर्गम क्षेञातील शिक्षक).*
*B) फक्त संवर्ग 3 मध्ये असणारे शिक्षक.*
*C) संवर्ग 3 यादीत नाव असणारे*,
*शेवटची संधी असणारे शिक्षक.*
9️⃣ *सुधारित रिक्त जागा व बदलीस पाञ शिक्षकांच्या जागा दाखविल्या जातात.*
1️⃣0️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*
1️⃣1️⃣ *अवघड क्षेञातील सलग सेवा ही*
*सेवा ज्येष्ठता म्हणून पकडली जाते.*
1️⃣2️⃣ *अवघड क्षेञातील सलग सेवा समान असल्यास वयाने ज्येष्ठ शिक्षकांचा विचार केला जातो.*
1️⃣3️⃣ *बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार केल्या जातात.*
1️⃣4️⃣ *बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाते.*
1️⃣5️⃣ *बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येतो.*
1️⃣6️⃣ *पहिल्या दिवशी रिक्त पदांचा* *योग्य ताळमेळ साधून, पसंतीक्रमानुसार शाळा निश्चित करणे आवश्यकच आहे.*
1️⃣7️⃣ *आपल्या मनाची परिपूर्ण खात्री झाल्यानंतरच दुसऱ्या / तिसऱ्या दिवशी ऑनलाईन फाॅर्म भरून घेणे आवश्यक ठरते.*
1️⃣8️⃣ *शेवटच्या दिवशी ऑनलाईन फाॅर्म भरण्याची धावपळ करून घेऊ नये, ऐनवेळेस पसंतीक्रमानुसार शाळा निश्चित करणे अवघड होऊन जाते.*
1️⃣9️⃣ *बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा सलग दुर्गम क्षेञातील शाळा घेऊन, पुन्हा भविष्यात बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून बदली मागू शकतो.*
2️⃣0️⃣ *बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा सुगम क्षेत्रातील शाळा घेऊन, सलग दहा वर्ष बदलीपासूून अलिप्त राहू शकतो.*
*वरील माहितीत काही त्रुटी राहू शकते.*
*अधिक माहितीसाठी सुधारित जी.आर. चे सखोल वाचन करावे.*
******************************************
**दि. 22 जुलै 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*संवर्ग दोन बदली बाबत*
*बदली टप्पा क्रमांक 28 सुरू*
पसंती क्रम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ न देता विशेष संवर्ग दोन ची फॉर्म भरण्याची मुदत संपली असून पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे.
*23 जुलै ते 24 जुलै*
या कालावधीत संवर्ग दोनच्या बदल्या करण्यासाठी व पसंती क्रमानुसार गावे निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन होईल.
त्यानंतर आज संवर्ग दोनच्या बदल्यांची प्रोसेस पूर्ण होऊन उद्याला त्यांची यादी व रिक्त पदाचा अहवाल संवर्ग 3 साठी प्रसिद्ध होईल. *(टप्पा क्रमांक 29)*
1) संवर्ग 3 साठी रिक्त पदांची यादी घोषित होईल. *(टप्पा क्रमांक 30)*
*2) लगेचच संवर्ग 3 साठी पसंती क्रम भरण्यासाठी संधी मिळेल. त्याचा कालावधी 25 जुलै ते 28 जुलै असण्याची शक्यता आहेच.*
*संवर्ग दोन साठी शिक्षक बांधवांना आपण पसंती दिलेल्या नुसार अपेक्षित शाळा मिळणारच आहे त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा🎈
******************************************
**दि. 19 जुलै 2025*
✳️संवर्ग 2 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम मोबाईलवरून कसा भरावा.*
******************************************
*दि.18 जुलै 25*
*✳️विशेष संवर्ग भाग-2 करिता महत्त्वाचे*
*➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना जिल्ह्यांतील संवर्ग एकच्या बदली प्रक्रियेमध्ये झालेल्या रिक्त , निव्वळ रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये भरता येतील अर्थातच ह्याच शाळा आपणास पोर्टलवर दिसतील*
*➡️ संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरतांना कमीत कमी 1 शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहेत*
*➡️ संवर्ग दोनच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरण्याकरिता कोणतेही याद्याची शोधा शोध न करता सरळ पोर्टल सुरू होताच पोर्टल वरील प्राधान्यक्रम भरण्याच्या प्रोसेस मधून ज्या तालुक्यातील प्राधान्यक्रम भरायचे आहे ते तालुके निवडावेत व त्यातील सर्व शाळांची यादी करावी त्या यादीतील शाळां चा 30 प्राधान्यक्रम तयार करावा व नंतर पोर्टलवर भरावा त्यामुळे आपला याद्यांची शोधाशोध करण्याचा वेळ वाचेल*
*✳️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम खालील प्रमाणे भरावा*
https://ott.mahardd.com/
*➡️ वरील लिंक वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे*
*➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे ऑप्शन दिसतील . त्यापैकी आपण "Intra district" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "application form" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*
*➡️ त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type व action असे दोन ऑप्शन दिसतील*
*➡️ Cadre 2 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की*
*➡️ Cadre 2 application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती *स्क्रीनवर दिसेल त्यावर*
*शिक्षकाचे नाव*
*आडनाव*
*शाळेचा Udise Number*
*शिक्षकाचा shalarth ID*
*ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही ही माहिती आपणास read only mode मध्ये दिसेल*
*➡️ त्याखाली आपणास आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल ते अंतर निश्चितच 30 किलोमीटरच्या वर असेल*
*➡️ त्याखाली आपणास आपला व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार उपप्रकार दिसेल*
*➡️ त्यानंतर आपणास आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा आपल्या जोडीदाराचा मोबाईल क्रमांक दिसेल*
*➡️ आपल्या जोडीदाराचे नाव दिसेल*
*➡️ त्यानंतर आपला जोडीदार ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा युडायस क्रमांक दिसेल*
*➡️ त्यानंतर आपल्या जोडीदार ज्या शाळेत कार्यरत असेल त्या शाळेचे नाव दिसेल*
*➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही*
*➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल*
*पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर*
*➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल*
*➡️ याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी 1 प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता*
*➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी*
*➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील*
*किती मंजूर पदे*
*किती कार्यरत पदे*
*शाळेतील रिक्त पदे*
*समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे*
*बदली पात्र शिक्षकांची पदे*
*ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील*
*➡️ Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल*
*➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे*
*➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी*
*➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल*
*➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences वर क्लिक करून शाळा add करावी व शाळा add केल्यानंतर save करावी*
*➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही*
*➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल*
*➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास आपला ई-मेल अपडेट असेल प्राप्त होईल*
*➡️तसेच आपणास जर आपण भरलेल्या प्राधान्यक्रमाची pdf print लागत असेल तर पुन्हा पोर्टल लॉगिन करून application form आल्यानंतर आपणास download टॅब दिसेल त्या ठिकाणावरून आपला फॉर्म आपण डाऊनलोड करू शकता*
*➡️ वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा*
*➡️दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकणार आहात.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*
➡️ *वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा*
*काही शंका असल्यास 97 67 39 77 07 वर कॉल करू शकता*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती मार्गदर्शन समुह*
*धन्यवाद*
***********************************************
*दि. 17 जुलै 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
1) *संवर्ग 1 ची बदली यादी eo आणि ceo लॉगिन ला उपलब्ध*
आज व उद्या पर्यंत सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रत्यक्ष सर्वांसाठी उपलब्ध होतील.
2) यादी बघताना आपली संवर्ग एक मधून कोणत्या शाळेवर बदली झाली म्हणजेच ह्या यु-डायस मधून त्या यु-डायस मध्ये बदली झाली आहे हे आपल्याला कळते.
3) आपण दिलेला कितव्या पसंती क्रमाची शाळा मिळाली हे देखील आपल्याला त्यामध्ये कळत आहे. व त्यापुढे ट्रान्सफर असे लिहिलेले आहे
4) ज्यांनी संवर्ग एक मधून पसंती क्रम दिला नव्हता म्हणजेच त्यांचा चॉईस 0 होता त्यांच्या नावापुढे नॉट ट्रान्सफर दिलेले आहे.
*5)सर्वात महत्त्वाचे मागे एक संभाव्य वेळापत्रक टाकले होते त्याप्रमाणेच 19 तारखेपासून संवर्ग 2 साठी पसंती क्रम भरणे सुरू होईल.*
******************************************
*बदली अपडेट सूचना*
प्रति,
गटशिक्षणाधिकारी ,
पंचायत समिती ..... सर्व
जिल्हा नांदेड
विषय : संवर्ग 02 च्या बदली अर्जाबाबत
संदर्भ :महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग प्राधिकृत व्हिंसिस आय टी सर्व्हिसेस पुणे यांच्याकडून आलेली सूचना दिनांक 17.07.2025
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की, विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 चा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे. दिनांक 18.07.2025 रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 02 चा टप्पा दिनांक 19.07.2025 रोजी सुरू होत आहे .
तरी आपल्या अधिनिस्त विशेष संवर्ग शिक्षक भाग 02 (पती पत्नी एकत्रीकरण ) मध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना दिनांक 19.07.2025 ते 22.07.2025 या कालावधीमध्ये ott.mahardd.com या बदली पोर्टलवर बदली अर्ज करण्यास अवगत करावे तसेच बदली अर्ज करण्यापासून कोणी वंचित राहिल्यास संबंधित शिक्षक स्वतः जबाबदार असेल हे त्यांना प्रकर्षाने अवगत करावे .
वंदना फुटाणे
शिक्षणाधिकारी (प्रा.)
जिल्हा परिषद नांदेड
******************************************
*दि. 18 जुलै 2025*
******************************************
*दि. 12 जुलै 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली पोर्टल अपडेट*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*संवर्ग 1 (विनंती बदली प्रकार)*
1️⃣ *बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागणारा पहिला दावेदार म्हणजे संवर्ग 1 होय.*
2️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*
3️⃣ *आपण कमीत कमी 1 ते 30 पसंतीक्रम , आपल्या इच्छेनुसार भरु शकतो*
4️⃣ *आपण जर बदलीस पाञ असाल बदलीस होकार दिला असल्यास किंवा टप्पा क्रमांक 7 मध्ये असाल बदलीस होकार दिला असल्यास तर 30 पसंतीक्रम देणे गरजेेचे असेल*
5️⃣ *आपली विनंती बदली ही 1.8.1 ते 1.8.20 नुसार, क्रमवारीनुसार होईल.*
6️⃣ *उपप्रकारानुसार, एकाच उपप्रकारात अनेक शिक्षक असतील तर सेवाज्येष्ठतेनुसार बदली होईल*
7️⃣ *उपप्रकारात सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य राहील*
8️⃣ *फक्त बदलीपाञ शिक्षकांच्या जागाच संवर्ग 1साठी दाखविल्या जातील*
9️⃣ *निव्वळ रिक्त पदे ही संवर्ग 1 साठी दाखवली जात नाहीत.*
🔟 *जर आपल्याला शाळा भेटली नाही तर,आणि आपण जर पुढील संवर्गा मध्ये पात्र असल्यास संबंधित टप्प्यावर आपली बदली होईल*
1️⃣1️⃣ *संवर्ग 1 मधून एकदा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील 3 वर्ष अर्ज करु शकणार नाहीत*
1️⃣2️⃣ *बदलीपाञ शिक्षकांच्या जागांचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे*
1️⃣3️⃣ *आपला संवर्ग 1 मधील यादीतील नंबर व उपप्रकारानुसार आपला असलेला क्रम पाहून, आपला पसंतीक्रम देणे गरजेचे आहे*
1️⃣4️⃣ *बदली फाॅर्म भरून झाल्यावर आपल्याला जी. मेल. द्वारे आपण भरलेल्या शाळा यांची सविस्तर माहिती जी.मेल. द्वारे आपल्याला प्राप्त होईल.*
1️⃣5️⃣ *आपण फक्त संवर्ग 1 मध्ये आहात, पुढील बदलीच्या* *कोणत्याच टप्प्यात नसाल, आपल्याला पसंतीक्रम देऊन* *शाळाच मिळालीच नाही ,तर आपण आहे त्या शाळेत राहणार आहात*
1️⃣6️⃣ *आपल्या संवर्ग 1 मध्ये आपल्या सिनियर शिक्षक किती आहेत ते पाहून आपले पसंतीक्रम निवडणे फारच आवश्यक आहे*
1️⃣7️⃣ *पसंतीक्रम भरून झाल्यावर तीन दिवस बदली पोर्टल रन होईल तद्नंतर संवर्ग 1 यांना, त्यांना मिळालेल्या शाळा(पसंतीक्रम)यांची यादी सविस्तर जाहीर होईल*
1️⃣8️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.4 नुसार, संवर्ग 1 मधून अर्ज भरून बदली करून घेतली,शिक्षकांबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना मत मांडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी असेल*
1️⃣9️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.5 नुसार जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली हे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य ती कारवाई प्रस्तावित करतील*
2️⃣0️⃣ *पसंतीक्रम भरताना* *आपल्या सोयीच्या, त्यानंतर मध्यम सोयीच्या त्यानंतर ज्या शेवटच्या मोजक्याच शाळा की आपल्याला मिळतील अशा, या पध्दतीने पसंतीक्रम भरणे गरजेचे ठरेल,आपल्या इच्छेनुसार आपण योग्य निर्णय घेणे आवश्यक*
***********************************************
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाची मुद्दे*
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*
*➡️ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग 3 वर्ष सेवा एक किंवा अनेक शाळांवर पूर्ण केलेली आहे.अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदली करिता अर्ज करता येईल (GR 1.7.1)*
*➡️बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवाजेष्ठतेचा विचार केला जाणार नाही* (GR 4.4.3)*
*➡️ अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील. (GR 4.4.4)*
*➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील सामानिकरणा व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील.(GR 4.4.5)*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर बदली करिता होकार (Yes )किंवा नकार (No )देण्याची सुविधा उपलब्ध असेल*
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजेच No निवडून आपला फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही*
*If teacher has selected "Willing for transfer" option as "No" then he will not get transferred in entitled round.*
✳️ *तसेच ज्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे Yes निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही*
*If he selects option "Yes" then he will be transferred as per his choices and availability of vacancies, and if no choice available then he will not get transferred in Entitled Round.*
*➡️ ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये*
*➡️तरीसुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टलवर होकार (Yes ) किंवा नकार (No ) देण्याची सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार (No ) देऊन फॉर्म सबमिट करावा येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही. यामध्ये आपली बदली होणार नाही*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार( Yes)नोंदवून 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा आपण बदली करिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपणास शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल (GR 4.4.6)*
*➡️अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना शाळेवरील किंवा त्या क्षेत्रातील तीन वर्ष सेवा अनिवार्य नसेल तसेच यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊन 31 मे 2025 पर्यंत तीन वर्ष पूर्ण झालेले असतील तर असे शिक्षक पुन्हा संवर्ग एक किंवा संवर्ग दोन चा लाभ घेऊ शकतात (शा आ.दि.21/2/19 व परिपत्रक दि.2/04/25 नूसार)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल (GR 4.2.6)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फार्म सबमिट होणार नाही (GR 3.2)*
*➡️बदली अधिकार पात्र शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदली पात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात.(GR 4.4.5)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पती-पत्नी एक युनिट मधून घेतलेली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या अवघड क्षेत्रामध्ये पती-पत्नी च्या शाळांचे अंतर 30 किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)*
*➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकाचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 30 किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)*
*➡️ पूर्वानुभावाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार पात्र शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदली पात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरिता प्रकाशित करण्यात आलेली असेल सदर यादींचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या सेवाजेष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेला प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लाऊन आपल्याला त्यातल्या त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपण आपला फार्म भरवा अशा शाळांचा यु डायस क्रमांक नोंदवून त्याचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाची ही वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विन्सेस ने दिलेल्या सूचना व शासन निर्णय यांचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा.*
*********************************************
*बदली अपडेट 2025*
*आज दिनांक 27 मे 2025 रोजी बदली पोर्टलवर लॉगिन केले असता बदली पोर्टल वर शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी 28 मे 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे*
*त्याबरोबरच गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरून शिक्षकांची प्रोफाइल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक 28 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.*
*बदली पोर्टलवर दिनांक 24 मे 2025 रोजी बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.*
*परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.*
*अवघड क्षेत्रातील ज्या शाळा 2022 ला सुगम करण्यात आल्या अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र मधून एक संधी देण्याकरिता त्यांची पुरवणी यादी सुद्धा अपलोड झालेली असेल*
*शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.*
*अर्थात दिनांक 28 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या व इतर याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात.*
*संचमान्यता सन 2023-24 व सन 2024-25 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करुन तयार ठेवावी. बदली प्रक्रिया करिता कोणती संख्या मान्यता घ्यावी याबद्दल अधिकृत झालेले नाही अधिकृत सूचना आरडीडी कडून प्राप्त झाल्यानंतर पोर्टल सुरु होताच सदर माहिती एक दिवसामध्ये भरुन पूर्ण करावी.*
*मे.विन्सीस कडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरु होईल.
***********************************************
📄 1. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली – शासन निर्णय (7 एप्रिल 2021)
हा शासन निर्णय जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचनांसाठी महत्त्वाचा आहे. यात खालील बाबींचा समावेश आहे:
बदल्या खो-खो पद्धतीने होतील.
समानीकरणातून बदलीस पात्र शिक्षकांची व्याख्या.
बदल्या टप्प्यानुसार कशा राबवाव्यात याचे स्पष्टीकरण.
डाउनलोड लिंक:
🔗 शिक्षक बदली GR – 7 एप्रिल 2021
📄 2. आंतरजिल्हा बदली – शासन निर्णय (1 डिसेंबर 2022)
हा शासन निर्णय खाजगी विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये किंवा तुकड्यांमध्ये बदल्यांबाबत आहे. यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट आहेत:
बदल्या संदर्भातील पूर्वीच्या शासन निर्णयांना स्थगिती.
बदल्या प्रक्रियेतील नवीन मार्गदर्शक सूचना.
डाउनलोड लिंक:
🔗 शासन निर्णय – 1 डिसेंबर 2022
📄 3. आंतरजिल्हा बदली – परिपत्रक (22 नोव्हेंबर 2022)
या परिपत्रकात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत माहिती दिली आहे.
डाउनलोड लिंक:
🔗 परिपत्रक – 22 नोव्हेंबर 2022
🌐 अधिकृत पोर्टल्स आणि संसाधने
शिक्षक बदली पोर्टल:
🔗
शासन निर्णयांचे अधिकृत संकेतस्थळ:
🔗
---------------------------------------------------------------------
➡️ *पुढे बदली प्रक्रिया कशी असेल*
➡️ *याद्या प्रसिद्ध,संवर्ग 1 ला होकार नकार व संवर्ग 2 ला होकार द्यावा लागू शकतो*
➡️ *संवर्ग 1 मधून ज्यांनी होकार व नकार दिलेला आहे व संवर्ग 2 मधून ज्यांनी होकार दिलेला आहे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल जर तपासणीमध्ये अपूर्ण कागदपत्र असले तर वरील शिक्षकांचे अर्ज हे रद्द करण्यात येतील*
➡️ *मग संवर्ग एक साठी गाव भरण्याची प्रक्रिया चालू होईल* 4 दिवस
➡️ *संवर्ग 2 गाव भरण्याची सुविधा दिली जाईल 4 दिवस*
➡️ *संवर्ग 3 म्हणजे अवघड मधील शिक्षकांना संधी दिली जाईल 4 दिवस*
➡️ *सर्वात मोठा सवर्ग म्हणजे संवर्ग चार संवर्ग 4 कमीत कमी 6 ते 7 दिवस संधी दिली जाईल*
➡️ *विस्थापित शिक्षक व अवघड क्षेत्रात जागा रिक्त झाल्यास त्यांच्यासाठी शेवटचे टप्पे राबवले जातील*
*शिक्षक बदली: Breaking News*
दिनांक: 31/05/2025
*दिनांक 31 मे किंवा 1जून ला eligible आणि entitled साठी नवीन यादी vinsys द्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.*
*सदर यादी हि अंतिम राहणार आहे. ज्या प्रमाणे संवर्ग निहाय actual बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.*
*ग्रामविकास विभाग तर्फे ह्या साठी vinsys तसेच संपूर्ण जिल्हा परिषद ला त्या प्रमाणे नवीन पत्र शनिवारी रात्री किंवा सोमवार ला प्रसिद्ध होणार आहे.*
*संवर्ग 1 व संवर्ग 2 बाबत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी त्या प्रमाणे नियोजन व कालावधी तयार झाला असल्याचे समजले आहे.*
*संचमान्यता मुळे सदर प्रक्रिया लांबत असल्यामुळे सर्व जिल्हा परिषद ला लवकर बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.*
*संचमान्यता हा अंतिम टप्पा सर्व जि. प. चा पूर्ण झाल्यावर लगेच संवर्ग 1 ते संवर्ग 5 पर्यंतचे संपूर्ण टप्पे लवकर पूर्ण करण्यासाठी ग्राम विकास विभाग तत्पर असल्याबाबत माहिती मिळाली आहे.*
-----------------------------------------------------------
🌹 आज वार: रविवार दिनांक: 1/6/2025 अपडेट्स=
आजची अपडेट घेतली असता -
*मुदत वाढीबद्दल घेतलेला निर्णय पत्राद्वारे बघायला मिळणार नाही. 28 तारखेच्या पत्रानुसार बदली प्रक्रियेसाठी सर्व जि प. सज्ज आहेत. विन्सिस ला सर्व गाईड लाईन देण्यात आलेल्या आहेत.अदययावत संच मान्यता जि प. कडून वापरण्यात येईल. कोर्ट मॅटर संदर्भातील सर्व केसेस व्यवस्थित हाताळण्यात आलेल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.*
*येत्या काही तासातच प्रक्रिया सुरु होणार आहे. कोणीही पॅनिक होऊ नये.*
*बदली प्रक्रिया सुरु होण्यासाठी विविध राज्य शिक्षक संघटनांनी केलेले प्रयत्न आणि नागपूर तसेच मुंबई हायकोर्टाचे आदेश यामुळे बदली गरजवंताना न्याय मिळणार आहे.*
माहितीस्तव
🌹 आज वार: सोमवार दिनांक: 2/6/2025 अपडेट्स=
आजची अपडेट घेतली असता -
*जिल्हांतर्गत बदली 2025 अपडेट*
*बदलीस पात्र ( Eligible), बदली अधिकार प्राप्त ( Entitled) व टप्पा क्र 7 साठी पात्र शिक्षकांची यादी काल काही जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आज दिनांक 2 जून 2025 ला राहिलेल्या जिल्ह्यांच्या प्रसिद्ध करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्थातच 2 जूनला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या वरील तिन्ही याद्या काही अडचण न आल्यास प्रसिद्ध झालेले असतील*
*त्यानंतर 3 जून ते 4 जून दरम्यान रिक्त पदे अपलोड करण्याकरिता beo login व Eo login vinsys कडून उपलब्ध करून देण्यात येईल*
*वरील कार्यवाही संपल्यानंतर लगेच पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील*
*रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी देण्यात येईल*
*बदली प्रक्रिये करिता मुदत ही 31 मे 2025 असल्यामुळें सदर कालावधी उलटून गेलेला आहे त्यामुळे आरडीडी कडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र येण्याची शक्यता आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रक सुद्धा अपलोड करण्यात येईल*
*वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास बदल होऊ शकतो*
* उद्या रिक्त पदांची माहिती भरण्यासाठी पोर्टल सुरु होईल व सदर माहिती सायंकाळ पर्यंत भरुन पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, रिक्त पदांची माहिती तयार ठेवावी.
*आस्था-14, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.*..
* *बदली बाबत आता सर्व शिक्षकांनी अलर्ट राहिले पाहिजे.*
*बदल्यांमध्ये संवर्ग 01 व 02 च्या होकार नकार ची प्रोसेस पुढील तीन दिवसामध्ये सुरू होऊ शकते.*..
🌹 आज वार: बुधवार दिनांक: 4/6/2025 अपडेट्स=
आजची अपडेट घेतली असता -
सूचना:
*RDD च्या निर्देशानुसार,*
सर्व जिल्ह्यांनी Entitled List आज (4 जून) दुपारी 2 वाजेपर्यंत पुनर्प्रकाशित करावी.
रिक्त पदांची (Vacancy) अद्ययावत प्रक्रिया ४ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ५ जून २०२५ मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील.
🌹 आज वार: गुरुवार दिनांक: 5/6/2025 अपडेट्स=
*दि.5 जून 2025*
*✳️जिल्हांतर्गत बदली 2025 अपडेट*
*संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*
*➡️ बदलीस पात्र ( Eligible), बदली अधिकार प्राप्त ( Entitled) व टप्पा क्र 7 साठी पात्र शिक्षकांच्या याद्या सर्व जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत*
*➡️ 4 जून ते 5 जून दरम्यान रिक्त पदे अपलोड करण्याकरिता beo login व Eo login vinsys कडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेला काही अडचणी आल्यास वेळ लागू शकतो*
*➡️ सोबतच समणीकरणाअंतर्गत ठेवायच्या जागा सुद्धा अपलोड केल्या जातील वरील कार्यवाही संपल्यानंतर लगेच पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील*
*➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल*
*➡️ बदली प्रक्रिये करिता मुदत ही 31 मे 2025 असल्यामुळें सदर कालावधी उलटून गेलेला आहे त्यामुळे आरडीडी कडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र येण्याची शक्यता आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रक सुद्धा वेळोवेळी टप्प्यानिहाय अपलोड केले जाईल*
*➡️ वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास बदल होऊ शकतो*
*✳️बदली पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*
*➡️टप्पा क्र.1, 2, 3 व 4 मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल*
*➡️जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग 1, 2, व 3 यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता दाखवण्यात येतील*
*➡️बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल*
*➡️बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठत्ता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.*
*➡️सर्व शिक्षकांना किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतीवेळी जिल्ह्यातील 30 पेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील*
*➡️विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल*
*➡️दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकणार आहात.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*
*➡️रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे.*
*➡️बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेले असतील त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये.*
*➡️या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा*
*➡️बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागतांना सेवाजेष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो.*
*✳️ बदली पात्र राऊंड मधील एक युनिट स्पष्टीकरण*
*➡️ 1) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय.*
*➡️ 2) दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र व जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल.*
*➡️ 3) वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.*
*➡️ 4) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही.*
*➡️ 5) बदली पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरिता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल बदली पात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिट चा लाभ घेऊ शकता*
*➡️ 6) जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.*
*➡️ 7) दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा जेष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही.*
*➡️ 8) बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.*
* ➡️ 9) एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही ३० किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल.*
*➡️ 10) पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.*
*➡️ 11) एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मधून बदली दिली जाईल*
*➡️ 12) व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली ने नियुक्ती दिली जाईल.*
*➡️ 13) पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल.*
*✳️ बदली पात्र शिक्षकांना बदली करिता नकार (पर्याय अ) किंवा होकार (पर्याय आ) देण्याच्या सुविधेबाबत*
*➡️जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 5 बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदली मध्ये मोडत असल्यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार परंतु क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितलेले नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राहून मध्ये जावे लागेल*
*➡️ विस्थापित राऊंड मधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्यांची शाळा देण्याची शक्यता आहे*
*➡️बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायांमध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती*
---------------------------------------------------------------------
*बदली अलर्ट*
प्रति,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती सर्व,
आपणास सूचित करण्यात येते की, प्राथमिक शिक्षक संवर्गातील जिल्हांतर्गत बदली सन 2025 करिता *संवर्ग 1 चे होकार / नकार आणि संवर्ग 02 चे होकार* फॉर्म भरण्यासाठी पोर्टल वर लवकरच सुविधा प्राप्त होणार आहे त्यामुळे *संवर्ग 01 व 02 मधील पात्र शिक्षकांना दक्ष राहण्यास अवगत करावे.*
संवर्ग 01 व 02 साठी पोर्टलवर सुविधा प्राप्त होताच आपणास दुबार कळवले जाईल.
शिक्षणाधिकारी ( प्रा.)
जिल्हा परिषद
--------------------------------------------------------------
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
बदली पोर्टल ला गेले असता संवर्ग एक साठी होकार नकार व संवर्ग दोन साठी अर्ज नोंदवण्याचे प्रक्रिया ही रात्री बारा वाजता पूर्ण झालेली असून कुठल्याही प्रकारची मुदत वाढ मिळाल्याची दिसून येत नाही. यानंतरची पुढील प्रक्रिया म्हणजे
1)आलेल्या अर्जानुसार संवर्ग 1 व 2 ची यादी पोर्टलवर प्रकाशित होईल.
2) यादी प्रकाशित केल्यानंतर त्यावर इतर शिक्षकांना आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल.
3)आक्षेप आल्यास त्यावर Ceo, Eo, Beo मार्फत सुनावणी घेऊन निर्णय देतील.
4)त्या नंतर संवर्ग 1 व 2 ची यादी अंतिम होईल.
आणि मग बदलीसाठी शाळा भरण्याची संधी संवर्ग एक दोन साठी मिळेल.
--------------------------------------------------------------
🌞 *Phase-3 जिल्हांतर्गत बदली* 🌞
*◆सध्या सुरू असलेले टप्पे-*
* *विशेष संवर्ग भाग-1 आणि विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म रद्द करणे.*
*●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.*
*●कालावधी-दि. 10.06.2025 ते 12.06.2025*
*दि. 07.06.2025 ते दि. 09.06.2026 या कालावधीत विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत.*
*या टप्प्यात फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या फॉर्मची प्रिंट व त्यासोबत आपापल्या संवर्गानुसार लागू असलेले पुरावे जोडून पडताळणीसाठी आपापल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करावेत. या फॉर्मची व पुराव्यांची गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समितीमार्फत पडताळणी होईल.*
*●या पडताळणीनंतर खालील प्रकारचे फॉर्म CEO लॉगिनवरुन Reject (रद्द) केले जातील.*
*1.पडताळणीत अवैध ठरलेले फॉर्म.*
*2.पुरावे सादर न करु शकलेल्या शिक्षकांचे फॉर्म.*
*3.मागील बदली संवर्ग 1 किंवा 2 मधून झाल्यानंतर ज्यांची शाळेत 3 वर्षे सेवा पूर्ण झाली नाही, अशा शिक्षकांनी भरलेले फॉर्म.*
*4.चुकून फॉर्म भरल्यानंतर अनावधानाने दिलेल्या मुदतीत Withdraw करावयाचे राहिलेले फॉर्म संबंधित शिक्षकांच्या विनंती अर्जावरून Reject केले जातील.*
*●या टप्प्यात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी Reject (रद्द) केलेल्या शिक्षकांचे फॉर्म पुन्हा पोर्टलवर स्वीकारले जाणार नाहीत.*
*●हा टप्पा संपल्यानंतर शिक्षणाधिकारी लॉगिनवरून विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 शिक्षकांच्या याद्या जाहीर / प्रसिद्ध करण्यात येतील.*
🌞 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....* 🌞
👉 बदली प्रक्रिया 2024- 25 चे *संभाव्य* वेळापत्रक
*बदली संवर्ग -१ :-*
13.06. 2025 ते 19.06 2025
कालावधी एकूण सात दिवस
*बदली संवर्ग २ :-*
20.06.2025 ते 25.06.2025
एकूण कालावधी सहा दिवस
*बदली संवर्ग ३:-*
26.06.2025 ते 01.07.2025
एकूण कालावधी सहा दिवस
*बदली संवर्ग 4 :-*
02.07.2025 ते 07.07.2025
एकूण कालावधी सहा दिवस
*विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड :-*
08.07.2025 ते 13.07.2025
एकूण कालावधी सहा दिवस
*अवघड क्षेत्रातील जागा भरणे:-*
14.07.2025 ते 17.07. 2025
एकूण कालावधी चार दिवस
*वरील वेळापत्रक हे संभाव्य असून यामध्ये जर कुठलीही न्यायालयीन किंवा प्रशासकीय अडचण निर्माण झाली नाही आणि याच पद्धतीने बदलीचे पोर्टल सुरू राहिले तर वरील वेळापत्रका नुसार बदल्या होण्याची शक्यता आहे. वरील वेळापत्रकात बदल होऊ शकतो कारण ते संभाव्य आहे.*
-------------------------------------
🙏🏻📜🖋️
*✳️ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 शिक्षकांनी मोबाईल वरून फॉर्म कसा भरावा*
*साभार*
*संजय नागे दर्यापूर यांच्या कडून*
*9767397707*
*दि. 7 जून 2025*
*2025 चे संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*
*➡️अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोन ला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल*
*➡️ जिल्हानिहाय रिक्त पदे पोर्टलवरअपलोड करण्याचे काम पूर्ण झालेली असून पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील*
*➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या बरोबर लवकरच संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल*
*➡️ संवर्ग एक व संवर्ग दोन ला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकर प्रकाशित होईल*
*➡️त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोन मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं*
*✳️संवर्ग एक व संवर्ग दोन चे सर्वसामान्य मुद्दे*
*➡️ संवर्ग एक च्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील*
*➡️ पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील*
*➡️ विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्या जाहीर करण्याकरिता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अर्ज भरून घेतल्या जात आहेत*
*➡️ या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा नाही*
*➡️ संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल*
*➡️ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही*
*➡️ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही*
*➡️ परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा*
*✳️मोबाईल वरून ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व संवर्ग भाग 2 चे शिक्षक खालील प्रमाणे फार्म भरू शकता*
*➡️ यापूर्वी आपण आपले प्रोफाइल पोर्टलवर अपडेट केलेले आहे आता संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*
https://ott.mahardd.com/
*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*
*➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*
*➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल*
*➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील . त्यापैकी आपण "जिल्हाअतंर्गत" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "अर्ज" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*
*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपणास*
*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा*
*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा*
*असे दोन टॅब दिसतील*
*➡️ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी "संवर्ग भाग 1 अर्ज करा" त्यावर क्लिक करा*
*➡️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*
*➡️त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*
*➡️ त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*
*➡️ क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*
*➡️जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*
*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*
*➡️ त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)*
*➡️(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*
*➡️आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा*
*➡️ Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*
*➡️ अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म मोबाईल वरून भरू शकतात*
*✳️आता संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना*
*➡️ "संवर्ग भाग 2 अर्ज करा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर disclaimer दिसून येईल त्या disclaimer बाजूच्या बॉक्सला टिक करा*
*➡️त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*
*➡️त्याखाली आपणास तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या अंतर किलोमीटर मध्ये नोंदवा अर्थातच ते 30 किलोमीटरच्या वर असेल*
*➡️व त्याखालील रकान्यात "विशेष संवर्ग भाग 2 चा प्राधान्यक्रम निवडा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर drop down मधून आपला विशेष संवर्ग भाग 2 मधील आपल्याला लागू पडणारा प्राधान्य क्रमांक 1 ते 7 मधून निवडा*
*✳️ वरील प्राधान्यक्रम 1 ते 7 मधील प्राधान्य क्रमांक 1 निवडल्यास*
*➡️आपण जर दोघेही जिल्हा परिषदचे कर्मचारी असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला ( 1) primary, 2) other than primary ) हे दोन पर्याय दिसून येतील*
*➡️ आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला( 1) primary, पर्याय निवडावा लागेल*
*➡️ त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर अशा शिक्षकांना जोडीदाराचा खालील रखान्यांमध्ये शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल*
*➡️ जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील रखान्यांमध्ये दिसून येईल*
*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*
*✳️ पर्याय क्रमांक 2 निवडल्यास (2) other than primary )*
*➡️ आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर*
*आपल्याला पर्याय क्रमांक दोन (2) other than primary ) निवडावा लागेल*
*➡️ पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर आपल्याला खालील रकान्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषद कार्यालयाचे नाव टाकावे लागेल*
*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण सवर्ग 1 व संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*
*✳️ पर्याय क्रमांक 2 ते 7 निवडल्यास*
*➡️ पती-पत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकाचा जोडीदार जिल्हा परिषदेचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर*
*➡️आपल्याला दोघांमधील अंतर टाकायचे आहे व आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती सबमिट करायची आहे*
*➡️ पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा*
*➡️ submit केल्यानंतर आपल्याला आपण आपल्याला आपण दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओटीपी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संवर्गात असेल तर या ठिकाणी फक्त एकच ओटीपी प्रविष्ट करावा लागेल*
*➡️ आपण भरलेला फॉर्म आपण पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकता*
*➡️परंतु आपण भरलेली माहिती आपणास चुकीची वाटत आहे तर अशा परिस्थितीत आपण आपला फॉर्म withdrawal सुद्धा करू शकता*
*सस्नेह धन्यवाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🍁 *Phase-3 जिल्हांतर्गत बदली* 🍁
*◆सध्या सुरू असलेला टप्पा-*
📌 *विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म भरणे.*
*●जबाबदार यंत्रणा-शिक्षक.*
*●कालावधी-दि. 07.06.2025 ते 08.06.2025*
*या टप्प्यात विशेष संवर्ग 1 व 2 च्या शिक्षकांनी आपापली सेवाविषयक माहिती व बदली पाहिजे किंवा नको एव्हढीच माहिती, म्हणजेच बदलीसाठी होकार किंवा नकार भरायचा आहे. प्रशासनाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व आपला अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचे प्राधान्यक्रम भरावयाचे आहेत.*
❓ *फॉर्म कोणी भरावे..?*
■■ *विशेष संवर्ग भाग-1* ■■
*●जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतील विशेष संवर्ग-1 च्या ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्यांनी बदलीसाठी होकाराचा फॉर्म भरावा. ज्यांना बदली नको आहे, त्यांनी बदलीतून सूट मिळण्यासाठी नकाराचा फॉर्म भरावा.*
*●जे शिक्षक वरील बदलीपात्र यादीत नाहीत, परंतु दिनांक 18.06.2024 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.1 ते 1.8.20 नुसार विशेष संवर्ग 1 साठी पात्र आहेत, त्यांना बदली हवी असेल तर त्यांनी होकाराचा फॉर्म भरावा.*
*•अवघड क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये बदलीपात्र नसलेल्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनीही नकाराचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.*
*●संवर्ग 1 मधून प्रथम बदलीसाठी सेवेची अट नाही, मात्र एकदा संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)*
📢 *विशेष संवर्ग भाग-1 साठी महत्वाच्या बाबी-*
*1.विशेष संवर्ग 1 शिक्षकांना बदलीसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतील.*
*●एक-बदलीतून सूट मागणे (नकार देणे)*
*●दोन-बदलीपात्र शिक्षकांना खो देणे.*
*●संवर्ग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6) ही तरतूद बदली अभ्यास गटाने विशिष्ट हेतू समोर ठेवून केली आहे.*
*●विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. बदलीतून सूट घेणे म्हणजेच बदलीसाठी नकार देणे हा सुद्धा विशेष संवर्ग 1 अंतर्गत घेतलेला "लाभच" आहे याची जाणीव ठेवावी.*
*●बदलीसाठी नकार देणारा बदलीपात्र विशेष संवर्ग 1 मधील शिक्षक हा जोपर्यंत त्याची बदली होणार नाही, तोपर्यंत दरवर्षी बदलीपात्रच राहणार आहे. अशा शिक्षकांना दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे.*
*2.विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. (G.R. मुद्दा क्र. 4.2.8)*
*●पडताळणीमध्ये अर्ज अपात्र ठरला तर संबंधित शिक्षकांचा अर्ज CEO लॉगिन वरून रद्द केला जाईल व चुकीची माहिती भरल्याबद्दल एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. (शासन निर्णय दि. 28.06.2018 व उपसचिव ग्रामविकास यांचे पत्र दि.11.08.2022)*
*3.विशेष संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)*
*4.दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.*
■■ *विशेष संवर्ग भाग-2* ■■
*●पती-पत्नी यांच्या सध्याच्या कार्यरत कार्यालयांमध्ये 30 कि.मी. पेक्षा जास्त अंतर असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात. शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.7 नुसार प्राधान्यक्रमाने संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.*
*●संवर्ग 2 मधून प्रथम बदलीसाठी सेवेची कोणतीही अट नाही, मात्र एकदा विशेष संवर्ग 2 मधून बदली झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.3.6)*
📢 *विशेष संवर्ग भाग-2 साठी महत्त्वाच्या बाबी-*
*1.विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या कार्यालयाच्या 30 कि.मी. परिघातील सर्व उपलब्ध जागांपैकी 30 पर्याय निवडता येतील.*
*2. 30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल. 30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)*
*इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.*
*3.विशेष संवर्ग 2 अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे.*
*4.अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.*
*5.बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास व खोटी माहिती भरून बदली झाल्याचे आढळल्यास G.R.मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5 मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करतील.*
💥💥💥💥💥💥💥💥
*👉🏻आज फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन यांनी आपल्याला बदली हवी किंवा नको एवढेच भरायचे आहे. त्यानंतर पोर्टलवर त्या शाळा रिक्त किंवा क्लोज केल्या जातील.बदली हवी असलेल्या शिक्षकांना पुन्हा पोर्टलवर ऑप्शन भरायचे आहेत.*
*📍होकार/नकार पर्याय काळजीपूर्वक निवडा.*
विशेष संवर्गातील शिक्षकांनी बदली पोर्टलवरती होकार/नकार कळविण्याची सुविधा चालू झालेली आहे.यावेळी होकार/ नकार काळजीपूर्वक निवडा जेणेकरून चुकीचा पर्याय निवडला जाऊन गैरसोय होणार नाही.
Do you want exemption from transfer?(तुम्हला बदलीतून सूट हवी आहे का?)
1)यावेळी बदली नको असेल(सूट हवी असेल तर) Yes हा पर्याय निवडावा.
2)बदली हवी असेल(सूट नको आहे) No हा पर्याय निवडावा.
बदली पोर्टलवर नमूद वाक्यरचना व्यवस्थित समजण्यासाठी पोर्टल भाषा मराठीतून करावी.
❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
✳️ *विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ?*
*दि. 12 जून 2025*
✳️*जिल्हांतर्गत बदली अपडेट*
*➡️ विशेष संवर्ग 1 व विशेष संवर्ग 2 अंतर्गत लाभ घेण्यात येणाऱ्या शिक्षकांचे सादर केलेल्या फॉर्म तालुकास्तरावर verification त्रिसदस्यीय समितीकडून पूर्ण करण्यात आलेले आहे*
*➡️ ज्या शिक्षकांच्या फॉर्ममध्ये पुराव्यांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत ते फॉर्म CEO login मधून reject करण्यात येतील*
*➡️ शक्यतो दिनांक 13.06.2025 रोजी विशेष संवर्ग भाग 1 व 2 च्या अंतिम याद्या मा. शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवरुन प्रसिद्ध होऊ शकतात.*
*➡️ प्रसिद्ध झालेल्या संवर्ग शिक्षक भाग 1 व संवर्ग शिक्षक भाग 2 च्या याद्यांवर जर कोणतेही शिक्षकाला आक्षेप घ्यायचा असेल तर शिक्षणाधिकारी यांचेकडे (Appeal to EO) व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे (Appeal to CEO) अपिल, आक्षेप, तक्रारी करता येणार आहेत.*
*➡️ वरील बदली प्रक्रिया दिनांक 13 जून व 14 जून दरम्यान पूर्ण करण्यात येईल तसेच संवर्ग 1 शिक्षकांना पसंती क्रम भरण्यासंदर्भात पोर्टलवर वेळापत्रक अपडेट होईल*
*➡️ तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या सुद्धा पुन्हा प्रसिद्ध होऊ शकतात*
*➡️ काही अडचणी न आल्यास दिनांक 15 जून 2025 पासून संवर्ग 1 ला पसंतीक्रम भरण्याकरिता वेळ दिला जाऊ शकतो*
✳️ *संवर्ग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा.*
✳️ *अद्याप पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता*
https://ott.mahardd.com/
✳️ *संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी 1 शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे*
✳️ *संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना पसंती क्रम भरताना पोर्टलवर फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील*
✳️ *जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील*
✳️ *परंतु आपण बदली पात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यांमध्ये बदली होऊ शकते*
✳️ *विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा*
https://ott.mahardd.in/
*➡️Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*
*➡️आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*
*➡️लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल*
➡️ *स्क्रीनवर आलेले declaration स्विकारून डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे*
➡️ *त्यातील application form वर क्लिक करावे*
➡️ *त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type व action असे दोन ऑप्शन दिसतील*
➡️ *Cadre 1 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की*
➡️ *Cadre 1 application form *स्क्रीनवर दिसेल त्यावर*
*शिक्षकाचे नाव*
*आडनाव*
*शाळेचा यु डायस नंबर*
*शिक्षकाचा शालार्थ आयडी*
*ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही*
➡️ *त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व* *त्याखाली आपला संवर्ग एक मधील प्रकार दिसेल*
*वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही*
➡️ *त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल*
*पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर*
➡️ *खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल*
➡️ *याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता*
➡️ *प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी*
➡️ *शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील*
*किती मंजूर पदे*
*किती कार्यरत पदे*
*शाळेतील रिक्त पदे*
*समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे*
*बदली पात्र शिक्षकांची पदे*
*ह्या सर्व संख्या दिसतील*
➡️ *Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्य क्रमामध्ये add केली जाईल*
➡️ *आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा add करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे*
➡️ *या ठिकाणी संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये दाखवल्या जातील*
➡️ *Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी*
➡️ *आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल*
➡️ *अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी*
➡️ *अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही*
➡️ *यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक otp येईल तो otp सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल*
➡️ *वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा
धन्यवाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा नाशिक
*****************************************
*दि. 13 जून 2025*
*जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली अपडेट.*
*आपल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये संवर्ग एकचे 1530 पैकी 44 अर्ज नाकारले Reject तर संवर्ग 2 चे 369 पैकी 11 अर्ज Reject नाकारले*
*संवर्ग 1 आणि 2 मधील शिक्षकांनी ऑनलाइन भरलेले होकार/नकार चे अर्ज सीईओ लॉगिन वरून पडताळणी करण्याची सुविधा 13 जून एक दिवस वाढविण्यात आले आहे .या कालावधीत संवर्ग 1 आणि 2 मध्ये अर्ज केलेल्या सर्वांची कागदपत्रे जिल्हा स्तरावर तपासणी होऊन वरील चार्ट बघता बरीच जिल्ह्यांचे कामे पूर्ण झालेले असून उर्वरित जिल्ह्यांची आज रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील त्यानंतर संवर्ग 1 आणि 2 मधील पात्र अंतिम याद्या जिल्हा स्तरावरुन प्रसिद्ध करण्यात येतील.*
---------------------------------------------------------------------
प्रति,
*गटशिक्षणाधिकारी*
*पंचायत समिती सर्व*
*शिक्षक बदली 2025 अंतर्गत संवर्ग 1 व संवर्ग 2, अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षक यांच्या याद्या आज पुन्हा प्रसिद्ध करण्यात येत आहेत.*
सदर याद्या आपल्या कार्यालयामार्फत व आपल्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सर्व शिक्षकांपर्यंत आजच पोहोचतील अशी व्यवस्था करा. तसेच यु-डायस मध्ये सर्व शाळांचे मेल आयडी आहेत.आपण प्रत्येक शाळेच्या मेल आयडीवर सुद्धा या याद्या पाठवू शकता.
*दिनांक 15 जून 2025 ते 17 जून 2025 या कालावधीत सदर याद्यांवर शिक्षकांना माननीय शिक्षणाधिकारी (EO)यांच्याकडे अपील दाखल करता येऊ शकेल.*
*असे अपील शिक्षक त्यांच्या लॉगिन मधून करू शकतील.*
तसे वेळापत्रक TTMS प्रणालीवर देण्यात आले आहे, ते सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे. जे शिक्षक अपील दाखल करतील, त्या शिक्षकांकडून अपिलाची प्रत आपल्या कार्यालयातच जमा करून घ्यावी,व जमा केलेल्या प्रतीसह सुनावणीवेळी आवश्यक कागदपत्रांसह आपण स्वतः उपस्थित राहावे.
सुनावणीसाठी केव्हा उपस्थित राहायचे याची तारीख व वेळ आपणास उद्या सायंकाळी लेखी स्वरुपात कळवण्यात येईल. परस्पर जिल्हा कार्यालयास अपीलाची प्रत न देता, ती तालुक्यामार्फतच आली पाहिजे, अशी सूचना सर्व शिक्षकांना द्यावी.
*उपरोक्त सर्व सूचना आपल्या गटातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. त्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी.*
शिक्षणाधिकारी (प्राथमिक )
जिल्हा परिषद नाशिक.
******************************************
*जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....
संवर्ग एक शिक्षक बांधवांसाठी खुलासा आपल्या नावापुढे Y/N लिहिले आहे याचाच अर्थ असा आहे की बदलीतून सूट हवी आहे का म्हणजेच आपण होय नोंदविले असेल तर Y म्हणजेच आपण आहेत त्याच शाळेवर राहू बदली होणार नाही.
बदलीतून सूट हवी आहे का नाही नोंदविले असल्यास N असेल तर आपण संवर्ग एक मधून बदली फॉर्म भरू शकतात.
******************************************
*जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली पोर्टल अपडेट*
*शिक्षकांनी याद्यावर अपील करण्याची मुदत आज रात्री 12 वाजता समाप्त होईल.*
*उद्यापासून पुढील 7 दिवसात शिक्षकांनी केलेल्या अपील वर जिल्हा शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन अपील मान्य/अमान्य करतील.यासाठी कालावधी दिनांक 18/06/2025 ते 24/06/2025 या सात दिवसांचा असेल.*
******************************************
*जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*सध्या सुरू असलेल्या जिल्हाअंतर्गत बदलीबाबत लागणारा वेळेबाबत बरीच सांशकता निर्माण केली जात आहे. *परंतु शासन निर्णयानुसार संपूर्ण बदली प्रक्रिया ही 42 टप्प्यातून पार पडत असते.* आतापर्यंत 42 पैकी 18 टप्पे पार पडले असून 19 व्या टप्प्यावर बदली प्रक्रिया आहे.
*****************************************
*..उच्च न्यायालयाचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 35 शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदली पासून दिलासा..*
जिल्हांतर्गत बदल्या करताना १.१० मध्ये बदलीपात्र शिक्षकाची व्याख्या करताना बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक अशी केलेली आहे.
त्यानुसार किमान एका शाळेत ५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय टप्पा क्र. ७ मध्ये अवघड क्षेत्रात सक्तीने बदली करण्यात येऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील ३५ प्राथमिक शिक्षक मे.उच्च न्यायालय मुंबई येथे सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड बालाजी शिंदे यांच्या मार्फत याचिका दाखल केली.
आज दि.२०/०६/२०२५ रोजी त्यांची याचिकेची पहिली सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती नीला केदार गोखले यांचेसमोर झाली. ॲड. बालाजी शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक हा जितका जास्त काळ एकाच शाळेच्या संपर्कात राहिल तितका तो स्थानिक परिस्थिती व समाज, पालक यांच्याशी जोडला जातो. त्यातून विद्यार्थी , शाळा व समाज यांमध्ये सुसंस्कार व नितिमत्तेची मूल्ये रूजूवू शकतो. तथापि, टप्पा क्र. ७ च्या नावाखाली शाळेत ५ वर्षे पूर्ण होण्याआधीच शासन आमच्या सक्तीने बदल्या करीत आहे जे शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधातही आहे. हे कोर्टाला पटवून दिले.
आजच्या सुनावणीत न्यायालयाने सदरच्या ३५ शिक्षकांची त्या शाळेत पुढील होईपर्यत आहेआज रोजी त्याच शाळेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ॲड बालाजी शिंदे यांचे अभिनंदन.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*
******************************************
*बदली प्राधान्य अलर्ट*
प्रति,
गटशिक्षणाधिकारी ,
पंचायत समिती..... सर्व,
*विषय : सेवानिवृत्तीस 01 वर्ष बाकी असलेल्या विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 मधील शिक्षकांबाबत.*
संदर्भ : ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन प्राधिकृत व्हिंसिस कडून आलेला संदेश दिनांक 20.06.2025
उपरोक्त संदर्भीय संदेशांच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की, प्राथमिक शिक्षक संवर्ग जिल्हांतर्गत बदली सन 2025 मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 मध्ये भाग घेतलेल्या अथवा न घेतलेल्या ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी आहे अशा शिक्षकांची यादी आपणास मेल द्वारे पाठवण्यात आली आहे .
त्या यादीतील शिक्षकांकडून ज्या शिक्षकांना बदली हवी आहे अथवा बदली नको आहे अशा सर्व शिक्षकांकडून, बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे.
यादी व हमीपत्र नमुना देण्यात येत आहे.( कृपया ई-मेल चेक करा. )
*मेल मध्ये सुद्धा सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तरी होकार अथवा नकार असलेल्या सर्वांचे हमीपत्र घेऊन, त्याची एकत्रित pdf बनवावी. तसेच त्याची hard copy व दिलेल्या नमुन्यातील माहिती दि.21 /6/2025 रोजी कोणत्याही परिस्थितीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत BRC नाशिक येथे पाठवावी.*
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद नाशिक
*****************************************
*दि. 24 जून 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली पोर्टल अपडेट*
*शासन स्तरावर बदली प्रक्रिया ही कुठेही थांबलेली नाही किंवा संथ गतीने सुरू नाही.शासन आदेशानुसारच प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बदल्या ह्या 100% होतील फक्त प्रश्न आहे कार्यमुक्त करण्याचा.*
*शिक्षकांनी केलेल्या अपील वर जिल्हा शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन अपील मान्य/अमान्य करतील.यासाठी आज रात्री बारा वाजता 24/06/2025 मुदत संपेल जर मुदत वाढली नाही तर आपल्या सर्वांचे लक्ष लागून आहे की संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम कधी भरण्यास सुरुवात होईल परंतु त्या अगोदर ह्या चार प्रक्रिया पूर्ण होतील*
1) माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे.
2) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपील स्वीकारणे किंवा फेटाळणे ही प्रक्रिया होईल.
3) संवर्गनिहाय एक ते चार संवर्गाच्या याद्या या पुन्हा जाहीर करण्यात येतील..
4) माननीय शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
5) त्यानंतर संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल.
******************************************
*जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणारच*
----------------------------------------
*ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे
ABRSM संलग्नित शिक्षक परिषदेला आश्वासन* ----------------------------------------
दि 30 जून
मुंबई....
*🏹 जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन असलेल्या विविध याचिका, संचमान्यता आदि प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत असला तरी बदल्या या होणारच याबद्दल राज्यातील शिक्षकांनी चिंतामुक्त रहावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.*
*🎤मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलतांना सांगितले आपल्या विचार परिवारातील राष्ट्रीय विचारांचे हे संघटन असल्याने आपल्याशी चर्चा करण्यात मला अत्यंत आनंद होत असल्याचे सांगून म्हणूनच आपल्याला तब्बल एक तास वेळ बैठकीसाठी दिल्याचे मंत्री महोदयांनी याप्रसंगी सांगितले शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी काय उपाययोजना करता येईल या विषयावर सखोल चर्चा झाली व मंत्री महोदयांनी राज्यातील शिक्षकांकडून या दोन्ही विषयात अपेक्षा व्यक्त केल्या.🎤*
*♟️या भेटी प्रसंगी सुरुवातीला मंत्री महोदयांनी यंदाच्या वारी दरम्यान वारकऱ्यांना पुरवलेल्या उपयुक्त सोयी सुविधांबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.*
*🎯या भेटीदरम्यान बदल्यांबाबत चर्चा करताना अनेक बिंदूंवर चर्चा करण्यात आली खोटे अंतर दाखवून संवर्ग दोन चा लाभ घेणे खोटे कागदपत्रे सादर करून संवर्ग एकचा* *लाभ घेणे या प्रकाराने मी स्वतः त्रस्त झालेलो आहे .सदर बाबी अत्यंत गंभीर असल्याचे मंत्री यांनी सांगितले*
*जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन असलेल्या विविध याचिका, संचमान्यता आधी प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत असला तरी बदल्या या होणारच याबद्दल राज्यातील शिक्षकांनी चिंतामुक्त रहावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले*.
*मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलतांना सांगितले आपल्या विचार परिवारातील राष्ट्रीय विचारांचे हे संघटन असल्याने आपल्याशी चर्चा करण्यात मला अत्यंत आनंद होत असल्याचे सांगून म्हणूनच आपल्याला तब्बल एक तास वेळ बैठकीसाठी दिल्याचे मंत्री महोदयांनी याप्रसंगी सांगितले शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी काय उपाययोजना करता येईल या विषयावर सखोल चर्चा झाली व मंत्री महोदयांनी राज्यातील शिक्षकांकडून या दोन्ही विषयात अपेक्षा व्यक्त केल्या*.
*आगामी जनगणना व जिल्हा परिषद निवडणुका या डोळ्यासमोर असल्याने बदल्या होणे अत्यंत आवश्यक गरजेचे असून राज्यातील शिक्षकांमध्ये विशेष करून अवघड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आपण बदल्या जलद गतीने होण्यासाठी आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे अशी विनंती शिष्टमंडळांनी केली असता यावर मंत्री महोदयांनी आपण निश्चिंत राहावे बदली प्रक्रिया ही होणारच या विषयात आपणास बदली प्रक्रिया बद्दल कुठेही काही अडचण असल्यास थेट मला येऊन संपर्क साधावा असेही शिष्टमंडळाला सांगितले.*
*🎤या एका तासाच्या भेटीदरम्यान राज्यातील प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तरपणे प्रदीर्घ अशी चर्चा करून सदर निवेदनाची नस्ती तयार करून त्याची ई फाईल तयार करण्यात आली व त्या फाईलवर पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले🎤*
*1 👉मुख्यालय राहण्याची अट रद्द करणेबाबत*
*मंत्री महोदय स्वतः सकारात्मक असून यावर शासनाकडून दिलेला पर्याय राज्यातील शिक्षकांनी स्वीकारला पाहिजे असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले*
*👉2 केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूपावर राज्यभरातून आलेले आक्षेपांचा विचार करून शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सेवा जेष्ठतेतून केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शासन निर्णय निर्गमित करणे बाबत शालेय शिक्षण विभागाला शिफारस करण्यात यावी*.
*👉3 शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती बाबत राज्यात एक वाक्यता सुसूत्रता समानता येण्यासाठी एकत्रित मार्गदर्शनाचा सुस्पष्ट शासन निर्णय निर्गमित होणे बाबत.*
*👉4 केंद्रप्रमुखांची 100% पदे प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सेवा जेष्ठतेतून भरणे बाबत*
*👉5 उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदासाठी 150 विद्यार्थ्यां संख्येवरून 100 पटसंख्या असणाऱ्या शाळांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद मंजूर करणे बाबत*
*👉6 पदवीधर प्राथमिक, विषय शिक्षकांना सरसकट वेतोन्नती देणे बाबत*
*👉7 2018 नंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ मंजूर होणे बाबत*
*👉8 राज्यातील जिल्हा परिषद शाळांना जिल्हा आर्थिक विकास नियोजन मंडळातून सोलर पॅनल उपलब्ध करून देणे बाबत*
*👉9 गुणवत्ता विकासात मुख्य अडचण निर्माण होणाऱ्या अध्यापनेत्तर ऑनलाइन कामासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळांना डाटा एन्ट्री ऑपरेटर मानधन तत्त्वावर नियुक्त करणेबाबत*.
*👉10 जिल्हा परिषद प्राथमिक /माध्यमिक शाळांना कॅशलेस विमा योजना मंजूर करणेबाबत*.
*👉11 ग्रामविकास विभाग बदली धोरण 18 जून 2014 मधील तरतुदी प्रमाणे पूर्वी अवघड क्षेत्रात सेवा करून आल्या शिक्षकांना पुन्हा अवघड क्षेत्रात बदली न देणेबाबत*.
*👉12 40 वय वर्ष असलेल्या पत्राच्या दगडाच्या कौलारू धोकेदायक मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांना निष्काशीत करून नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देणे बाबत*
*👉13 एकाच आवारात भरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक/ माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन एकच करणे बाबत*
*👉14 उच्च विद्या विभूषित नेट, सेट, एम फिल ,पी एच डी ,अहर्ता प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना विस्तार अधिकारी( शिक्षण) गटशिक्षणाधिकारी यांच्या पदोन्नती मध्ये प्राधान्य क्रमाने विशेष आरक्षणाची तरतूद करण्याबाबत*.
*👉15 शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी 50 टक्के गुणांची अट रद्द करणे बाबत*
*🎤उपरोक्त १ ते १५ विषयांवर तब्बल एक तास मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील धोरणात्मक निर्णयांवर अधिकाऱ्यांशी व कॅबिनेट समोर चर्चा करून सकारात्मक निर्णय केले जातील निवेदनातील मुद्दे पुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून अधिकाऱ्यांची मते जाणून निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले विशेष करून मुख्यालय राहण्याची अट रद्द करणे, डाटा एन्ट्री ऑपरेटर केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात एकत्रित सेवा जेष्ठता या विषयात मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक असून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.*
*🎯ABRSM संलग्नित शिक्षक परिषदेच्या या शिष्टमंडळात प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे प्रांत सहकार्यवाह नितीन पवार प्रांत महिला आघाडी सहप्रमुख सुरेखा ताजवे नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे जिल्हा कार्य व साईनाथ भालेरावआदींचा शिष्टमंडळात सहभाग होता*.
*पुरुषोत्तम वसंत काळे*
*महाराष्ट्र प्रांत कार्यवाह*
*ABRSM संलग्नित महाराष्ट्रराज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग*
******************************************
*दि. 12 जुलै 2025*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*बदली पोर्टल अपडेट*
🎯🎯 *जिल्हा अंतर्गत बदली बाबत.....*
*संवर्ग 1 (विनंती बदली प्रकार)*
1️⃣ *बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागणारा पहिला दावेदार म्हणजे संवर्ग 1 होय.*
2️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*
3️⃣ *आपण कमीत कमी 1 ते 30 पसंतीक्रम , आपल्या इच्छेनुसार भरु शकतो*
4️⃣ *आपण जर बदलीस पाञ असाल बदलीस होकार दिला असल्यास किंवा टप्पा क्रमांक 7 मध्ये असाल बदलीस होकार दिला असल्यास तर 30 पसंतीक्रम देणे गरजेेचे असेल*
5️⃣ *आपली विनंती बदली ही 1.8.1 ते 1.8.20 नुसार, क्रमवारीनुसार होईल.*
6️⃣ *उपप्रकारानुसार, एकाच उपप्रकारात अनेक शिक्षक असतील तर सेवाज्येष्ठतेनुसार बदली होईल*
7️⃣ *उपप्रकारात सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य राहील*
8️⃣ *फक्त बदलीपाञ शिक्षकांच्या जागाच संवर्ग 1साठी दाखविल्या जातील*
9️⃣ *निव्वळ रिक्त पदे ही संवर्ग 1 साठी दाखवली जात नाहीत.*
🔟 *जर आपल्याला शाळा भेटली नाही तर,आणि आपण जर पुढील संवर्गा मध्ये पात्र असल्यास संबंधित टप्प्यावर आपली बदली होईल*
1️⃣1️⃣ *संवर्ग 1 मधून एकदा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील 3 वर्ष अर्ज करु शकणार नाहीत*
1️⃣2️⃣ *बदलीपाञ शिक्षकांच्या जागांचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे*
1️⃣3️⃣ *आपला संवर्ग 1 मधील यादीतील नंबर व उपप्रकारानुसार आपला असलेला क्रम पाहून, आपला पसंतीक्रम देणे गरजेचे आहे*
1️⃣4️⃣ *बदली फाॅर्म भरून झाल्यावर आपल्याला जी. मेल. द्वारे आपण भरलेल्या शाळा यांची सविस्तर माहिती जी.मेल. द्वारे आपल्याला प्राप्त होईल.*
1️⃣5️⃣ *आपण फक्त संवर्ग 1 मध्ये आहात, पुढील बदलीच्या* *कोणत्याच टप्प्यात नसाल, आपल्याला पसंतीक्रम देऊन* *शाळाच मिळालीच नाही ,तर आपण आहे त्या शाळेत राहणार आहात*
1️⃣6️⃣ *आपल्या संवर्ग 1 मध्ये आपल्या सिनियर शिक्षक किती आहेत ते पाहून आपले पसंतीक्रम निवडणे फारच आवश्यक आहे*
1️⃣7️⃣ *पसंतीक्रम भरून झाल्यावर तीन दिवस बदली पोर्टल रन होईल तद्नंतर संवर्ग 1 यांना, त्यांना मिळालेल्या शाळा(पसंतीक्रम)यांची यादी सविस्तर जाहीर होईल*
1️⃣8️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.4 नुसार, संवर्ग 1 मधून अर्ज भरून बदली करून घेतली,शिक्षकांबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना मत मांडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी असेल*
1️⃣9️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.5 नुसार जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली हे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य ती कारवाई प्रस्तावित करतील*
2️⃣0️⃣ *पसंतीक्रम भरताना* *आपल्या सोयीच्या, त्यानंतर मध्यम सोयीच्या त्यानंतर ज्या शेवटच्या मोजक्याच शाळा की आपल्याला मिळतील अशा, या पध्दतीने पसंतीक्रम भरणे गरजेचे ठरेल,आपल्या इच्छेनुसार आपण योग्य निर्णय घेणे आवश्यक*
**********************************************************************************************
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share
No comments:
Post a Comment