"...नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुंजवाड येथे तालुकास्तरीय उल्हास मेळावा..."








 आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजवाड येथे तालुकास्तरीय उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रत्येक नवसाक्षरांना आणि स्वयंसेवकांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक केंद्रातून स्टॉल मांडणी करण्यात आलेली होती. यामध्ये दिलेल्या  विविध विषयांवरती शिक्षकांनी सादरीकरण केले. ताहाराबाद केंद्रातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठगड येथील श्री गणेश महाले सर यांनी  वित्तीय साक्षरता या विषयावर सादरीकरण केले. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समुहनृत्य ,एकांकिका, नाटिका, पथनाट्य सादरीकरणाने मेळाव्याची सुरुवात झाली.  विविध शाळांच्या सहभागाने कार्यक्रम वैविध्यपूर्ण झाला. माननीय गटशिक्षणाधिकारी  चित्रा  देवरे मॅडम, मा . विस्ताराधिकारी पवार साहेब, मा. विस्तार अधिकारी महाले साहेब, व मा. सर्व केंद्रप्रमुख आणि उपस्थितांनी सर्व स्टॉलला भेट देऊन पाहणी केली . सकाळी 11.00 वा. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासंदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले.

Share